"मोबाईल अॅडिक्शन फक्त मुलांचंच नाही, आज्या-आईंपर्यंत पोहोचलंय..", अभिनय बेर्डे स्पष्टच बोलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 17:19 IST2025-12-02T17:18:28+5:302025-12-02T17:19:13+5:30
Abhinay Berde And Priya Berde : नुकतेच लोकमत फिल्मीच्या सेलिब्रेटी किड्स शोमध्ये अभिनय बेर्डेने त्याची आई आणि अभिनेत्री प्रिया बेर्डेंसोबत हजेरी लावली होती. यावेळी अभिनयने मोबाईलच्या व्यसनाबद्दल एक अतिशय स्पष्ट मत मांडले.

"मोबाईल अॅडिक्शन फक्त मुलांचंच नाही, आज्या-आईंपर्यंत पोहोचलंय..", अभिनय बेर्डे स्पष्टच बोलला
अभिनेता अभिनय बेर्डे मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात घर केले आहे. शेवटचा तो 'दशावतार' सिनेमात पाहायला मिळाला होता. या सिनेमातील त्याच्या कामाचं खूप कौतुक झालं. तसंच या सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली. त्यानंतर आता तो 'उत्तर' या सिनेमात पाहायला मिळणार आहे. नुकतेच लोकमत फिल्मीच्या सेलिब्रेटी किड्स शोमध्ये अभिनय बेर्डेने त्याची आई आणि अभिनेत्री प्रिया बेर्डेंसोबत हजेरी लावली होती. यावेळी अभिनयने मोबाईलच्या व्यसनाबद्दल एक अतिशय स्पष्ट मत मांडले.
अभिनय बेर्डे लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत मोबाईल अॅडिक्शनबद्दल म्हणाला की, "मुलं मी एक वेळेस कमी म्हणेन. ते ५०-६०चा जो वयोगट आहे ना ते कॅण्डीक्रश आणि व्हॉट्सअॅपवरती इतके बिझी असतात ते इतके बिझी असतात त्याच्यामध्ये मोबाइल अॅडिक्शन हा फक्त लहान मुलांचा किंवा माझ्या वयोगटातल्या मुलांचा प्रॉब्लेम राहिलेला नाहीये. तो सगळीकडे गेलेला आहे. आज्यांचा पण झालेला आहे. आया सोडूनच द्या. आज्यांचा पण झालेला आहे."
अभिनय बेर्डे याच्या या वक्तव्यावरून स्पष्ट होते की, मोबाईल वापरण्याची सवय केवळ तरुण पिढीतच नाही, तर प्रौढांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
'उत्तर' सिनेमाबद्दल
'उत्तर'मध्ये रेणुका शहाणे आईच्या तर अभिनय बेर्डे मुलाच्या भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्यासोबत ऋता दुर्गुळे आणि एका खास भूमिकेत निर्मिती सावंत सुद्धा दिसणार आहेत, या शिवाय पहिल्यांदाच ‘अनमिस’नावाचं एक एआय पात्र सुद्धा यात झळकणार आहे. 'डबलसीट', 'फास्टर फेणे' या सारखे महत्वाचे चित्रपट आणि 'दोन स्पेशल', 'भूमिका' सारखी क्लासिक नाटकं देणाऱ्या क्षितिज पटवर्धन यांनी उत्तरमध्ये कथा, पटकथा लिखाणासोबत पहिल्यांदाच दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
झी स्टुडिओजचे उमेशकुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर तसेच जॅकपॉट एंटरटेनमेंटचे मयूर हरदास आणि संपदा वाघ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून १२ डिसेंबरला ‘उत्तर’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.