मराठी चित्रपट हंपीच्या वाटेवर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2016 11:54 IST2016-11-30T11:54:56+5:302016-11-30T11:54:56+5:30
सादरीकरणाच्या चौकटी मोडून आता मराठी चित्रपट नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे. नवनवीन लोकेशन्स आणि त्या अनुषंगानं कथानकाची मांडणी हे ...

मराठी चित्रपट हंपीच्या वाटेवर!
स दरीकरणाच्या चौकटी मोडून आता मराठी चित्रपट नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे. नवनवीन लोकेशन्स आणि त्या अनुषंगानं कथानकाची मांडणी हे मराठी चित्रपटाचं वैशिष्ट्य अधोरेखित होऊ लागलं आहे. नुकतेच एका मराठी चित्रपटाचे विदेशात शूटिंग झाले. आता आणखीन एका आगामी मराठी चित्रपटाचे शूटिंग कर्नाटकातल्या ऐतिहासिक हंपी इथे सुरु आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकश कुंटे करतायेत तर स्वरूप समर्थ एंटरटेन्मेन्टने या चित्रपटाची निर्मिती केलीय. एका मुलीच्या भावनिक प्रवास या चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, प्रियदर्शन जाधव, ललित प्रभाकर अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 'चित्रीकरणासाठी तीच-तीच लोकेशन घेण्यापेक्षा नवा परिसर दाखवणं आवश्यक असते असे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी सांगितले. तसेच हंपी या ठिकाणाला ऐतिहासिक संदर्भ तर आहेच. तसंच हे ठिकाण कथानकाचा एक भाग आहे त्यामुळे प्रेक्षकांना नक्कीच एक वेगळं कथानक पहायला मिळेल,' असे कुंटेंनी सांगितले. प्रकाश कुंटे यांनी दिग्दर्शित केलेले कॉफी आणि बरंच काही अँड जरा हटके हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. त्यांच्या या चित्रपटांचं कौतुकहीदेखील करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या या आगामी चित्रपटाकडूनदेखील प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. तसेच कॉफी आणि बरंच काही या चित्रपटातून प्रार्थना बेहेरेने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्याच्या अभिनायचे देखील कौतुक झाले होते.