"१३ वर्षांच्या मुलाला ब्लड कॅन्सर झाला अन्...", दिग्दर्शक रवी जाधव यांच्या पत्नीने सांगितला 'तो' हृदयद्रावक अनुभव, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 11:37 IST2025-12-09T11:28:46+5:302025-12-09T11:37:59+5:30
मराठीतील एक नावाजलेले दिग्दर्शक म्हणून रवी जाधव यांच्याकडे पाहिलं जातं.रवी जाधव यांच्याप्रमाणे त्यांची पत्नी मेघना देखील इंडस्ट्रीत अॅक्टिव्ह आहे.नुकतीच मेघना यांनी एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील कठीण काळ सांगितला.

"१३ वर्षांच्या मुलाला ब्लड कॅन्सर झाला अन्...", दिग्दर्शक रवी जाधव यांच्या पत्नीने सांगितला 'तो' हृदयद्रावक अनुभव, म्हणाल्या...
Meghna Jadhav: दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी मराठीसह बॉलिवूड इंडस्ट्रीतही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजवर रवी यांनी अनेक उत्तम चित्रपटांची निर्मिती केली आहे. रवी जाधव यांच्याप्रमाणे त्यांची पत्नी मेघना देखील इंडस्ट्रीत अॅक्टिव्ह आहे.नुकतीच मेघना यांनी एका ठिकाणी मुलाखत दिली. ज्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.या मुलाखतीत मेघना यांनी त्यांच्या आयुष्यातील कठीण काळावर भाष्य केलं.
रवी जाधव यांनी मेघना यांनी ५ डिसेंबर १९९८ मध्ये लग्न केलं. गेली अनेक वर्ष ते सुखाने संसार करत आहेत.मात्र, त्यांनी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. या जोडप्याला दोन मुले आहेत. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांच्या धाकट्या मुलाला ब्लड कॅन्सरचं निदान झालं होतं. 'सर्व काही क्लिप्स' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मेघना जाधव यांनी त्या कठीण प्रसंगाविषयी सांगितलं. त्या म्हणाल्या, "माझ्या मोठ्या मुलाला काही हेल्थ ईश्यू होते. वयाच्या १३ व्या वर्षी त्याला ब्लॅड कॅन्सरचं निदान झालं. त्याचं वय वाढत होतं तसं मी त्याच्यासाठी काहीतरी प्लॅन करत होते.नंतर त्याला अचानक त्रास व्हायला लागला. आपण कधीच असा विचार नाही करत. त्यामुळे आम्हाला वाटलं ८-१० दिवसांत तो बरा होईल."
पुढे त्या म्हणाल्या,"त्याची तब्येत खूप बिघडायला लागली, आम्हाला काही कळत नव्हतं. मग रिपोर्ट आले आणि आम्ही ठरवलं की, आपण आपल्या मुलाला ही गोष्ट सांगायची नाही.त्यादिवशी मी खूप रडले.त्यानंतर रात्रीचे दीड दोन वाजलेले मी उठले आणि सगळ्यांना म्हटलं,बस! संकट आलंय, त्याला सामोरं गेलं पाहिजे. तो माझी वाट बघत होता.मी मुलाजवळ गेले आणि त्याने मला विचारलं, 'आता माझा जीव जाणार?' मी म्हटलं नाही.सहा महिने आता तू सुट्टीवर, मी जे सांगेन त्यावर विश्वास ठेव.तू यातून नक्कीच बाहेर पडशील. पूर्ण सहा महिने मला त्याने काहीच विचारलं नाही. कधीपण मी त्याच्या समोर गेले की तो माझ्याकडे बघायचा. म्हणजे मी कशी दिसतेय यावरून त्याला कळायचं की काही सिरिअस आहे की नाही. हॉस्पिटलमध्ये आपण कसंही जातो.त्याच्यासाठी मी स्वतः व्यवस्थित राहिले." असं मेघना यांनी पुढे सांगितलं.
मला त्याच्या डोळ्यात अश्रू पाहायचे नव्हते…
"मग आम्ही सगळ्यांना सांगितलं. ज्या लोकांना त्याला बघून दया येईल, दु:ख वाटेल. अशा लोकांनी स्ट्रिक्टली येऊ नका. कारण, मला त्याच्या डोळ्यात अश्रू पाहायचे नव्हते.पण सहा महिन्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली. आणि मी त्याला दिलेलं वचन पाळू शकले नाही. मला त्याचा बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट करावं लागलं, त्यासाठी मला त्याला घेऊन बंगळूरूला जायचं होतं. तिथे आम्ही दोघंच गेलो. त्याला चांगलं वाटावं म्हणून मी तयार व्हायचे. आम्ही सिनेमा बघायचो डान्स करायचो या सगळ्यात खूप सकारात्मक वातावरण निर्माण झालं होतं आणि आता माझा मुलगा त्यातून बाहेर आला."