"मागून नावं ठेवणारे...", प्रिया बेर्डेंनी सांगितलं पडद्यामागचं भीषण वास्तव, म्हणाल्या-"अभिनय इंडस्ट्रीत आला तेव्हा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 16:15 IST2025-12-02T16:09:34+5:302025-12-02T16:15:21+5:30
"लोकांनी खूप ट्रोल केलं, इंडस्ट्रीत भरपूर काही…", लेक अभिनयसोबत घडलेल्या गोष्टी प्रिया बेर्डेंनी आणल्या समोर

"मागून नावं ठेवणारे...", प्रिया बेर्डेंनी सांगितलं पडद्यामागचं भीषण वास्तव, म्हणाल्या-"अभिनय इंडस्ट्रीत आला तेव्हा..."
Priya Berde: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनयने वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत पदार्पण केलं. अभिनयही आता कलाविश्वात स्थिरावला आहे.दरम्यान, लक्ष्मीकांत बेर्डेंच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी एकटीने मुलांचं संगोपन केलं. अभिनयने सिनेसृष्टीत पदार्पण केल्यापासून अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केलंय. मात्र, बऱ्याचदा त्याला विनाकारण ट्रोलिंगचा सामना करावा लागला. नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या प्रिया बेर्डेंनी अभिनयच्या इंडस्ट्रीतील प्रवासावर भाष्य केलंय.
नुकतीच प्रिया बेर्डे आणि मुलगा अभिनय या मायलेकाच्या जोडीने मुलाखत दिली. त्यादरम्यान, दोघांनीही सिनेइंडस्ट्रीतील त्यांचे अनुभव तसेच वैयक्तिक आयु्ष्याबद्दल अनेक खुलासे केले.दरम्यान, अभिनयला इंडस्ट्रीत आलेल्या अनुभावांवर बोलताना प्रिया बेर्डे म्हणाल्या, "अभिनय इंडस्ट्रीत आला तेव्हा तो कुठल्याही प्रकारचं शिक्षण घेऊन आलेला नव्हता. त्यामुळे लोकांनी त्याला खूप ट्रोल केलं. त्याला नेपोटिझमच्या बाबतीतही खूप बोललं गेलं. पण लोकांना हे कळत नाही की आम्ही ज्या पद्धतीचं आयुष्य जगतो. तिथे काय कष्ट आहेत किंवा या मुलांना कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो.
इंडस्ट्रीत भरपूर काही गोष्टी असतात.जसं बाहेर सगळेच तुमचं कौतुक करत नाही, तसं इथे सगळेच तुमचं कौतुक करत नाहीत. इथे तोंडावर गोड बोलणारे खूप असतात. मागून नावं ठेवणारे असतात.या सगळ्या गोष्टी अभिनयने पचवून तो आज जो एक माणूस म्हणून कलाकार म्हणून उभा राहिलाय हे फक्त त्याचं यश आहे. "
दरम्यान, अभिनेता अभिनय बेर्डेला विचारण्यात आलं की, वेळेच्या आधी मोठं होणं तुला स्वत ला माणूस म्हणून किती प्रगल्भ करून गेलं? यावर उत्तर देत अभिनय म्हणाला, सगळ्यात पहिली गोष्ट स्वानंदी आणि आई दोघीही खूप खंबीर आहेत. त्यामुळे त्यांची जबाबदारी घेण्याची कोणालाही गरज नाही. पण, आमच्या घरामध्ये असं कोणी एकच माणूस नाही की जो कर्ताधर्ता आहे. आता तिघांबद्दल बोलायचं झालं तर तीन रुममे्टस जे समान वयाचे आहेत एकत्र राहताना कसे राहतात तसे आम्ही राहतो.एक कोणतीरी लिडर आहे, असं अजिबात नाही.
पुढे तो म्हणाला, "प्रत्येकाच्या जबाबदऱ्या आहेत आणि त्या प्रत्येकाला पूर्ण करायच्या आहेत हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे त्याचं काही टेन्शन येण्याचं कारण नाही.कारण ती आपली जबाबदारी आहे आणि त्याचं प्रेशर घेण्याचं काही कारण नव्हतं. शिवाय आईने ते प्रेशर येऊ दिलं नाही."