"पाटलीणबाई तुमच्याबरोबर म्हातारं होण्यात..." हेमंत ढोमेची क्षिती जोगसाठी खास पोस्ट, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 17:54 IST2025-12-07T17:54:24+5:302025-12-07T17:54:52+5:30
हेमंतने सोशल मीडियावर क्षिती जोगसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

"पाटलीणबाई तुमच्याबरोबर म्हातारं होण्यात..." हेमंत ढोमेची क्षिती जोगसाठी खास पोस्ट, म्हणाला...
अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि अभिनेत्री, निर्माती क्षिती जोग मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपे आहेत. क्षिती अभिनयात सक्रिय असली तरीही हेमंत सध्या दिग्दर्शन क्षेत्रात आपले नशीब आजमावत आहे. या क्षेत्रात देखील त्याला भरपूर यश मिळाले. या सर्व गोष्टीत क्षितीने त्याला मोलाची साथ दिली. आज हेमंत आणि क्षिती यांच्या लग्नाचा १३ वाढदिवस आहे. यानिमित्तानं हेमंतने सोशल मीडियावर क्षिती जोगसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत आली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर क्षितीबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. क्षीतीवरचं प्रेम व्यक्त करत त्यानं लिहलं, "पाटलीणबाई तुमच्याबरोबर राहून दाढी पांढरी झाली. तुमच्यामुळे असं आज म्हणणार नाही. पण, तुमच्याबरोबर म्हातारं होण्यात लई मजा आहे. असेच राहूया. एकमेकांबरोबर जगूया. बाकी तुला तर माहीतच आहे. खूप खूप प्रेम आणि लग्नाच्या तेराव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. लव्ह यू". या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांसह मराठी सेलिब्रिटींनी या जोडीला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत
हेमंत आणि क्षितीची हटके लव्हस्टोरी
हेमंत आणि क्षिती यांची पहिली भेट 'सावधान शुभमंगल या नाटाकाच्या रिहर्सलवेळी झाली होती. त्याआधी हेमंत क्षितीला ओळखत होता. ती त्याच्या एका नाटकाला देखील गेली होती. पण, सावधान शुभमंगल या नाटाकाच्या रिहर्सलच्या दोघांची चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर पुढे प्रेमात आणि नंतर आयुष्यभराच्या सहजीवनाचा निर्णय घेण्यामध्ये झालं. २०१२ मध्ये त्यांनी लग्न केलं. क्षिती हेमंतपेक्षा ३ वर्षाने मोठी आहे. व्यावसायिक आयुष्यात तिची सुरुवात हेमंतच्या आधी झाली. कलाक्षेत्र, आपापली कामं आणि घर या सगळ्याच बॅलन्स संभाळत या दोघांचा सुखाचा संसार सुरू आहे. क्षिती ही मराठी सिनेसृष्टीतले दिग्गज कलाकार अनंत जोग आणि उज्वला जोग यांची लेक आहे. क्षिती १८ वर्षांची असताना तिचे आईवडिल वेगळे झाले होते.