चंद्रकांत कुलकर्णी, कांचन सोनटक्के यांचा 'चैत्र चाहूल' पुरस्काराने गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2017 18:07 IST2017-03-29T12:27:15+5:302017-03-29T18:07:51+5:30

'चैत्र चाहूल' तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या 'रंगकर्मी' सन्मान आणि 'ध्यास' सन्मान  या दोन्ही पुरस्काराचे वितरण मंगळवारी एका शानदार समारंभात ...

Gaurav, Chandrakant Kulkarni, Kanchan Sontakke, 'Chaitra Shonlog' | चंद्रकांत कुलकर्णी, कांचन सोनटक्के यांचा 'चैत्र चाहूल' पुरस्काराने गौरव

चंद्रकांत कुलकर्णी, कांचन सोनटक्के यांचा 'चैत्र चाहूल' पुरस्काराने गौरव

'
;चैत्र चाहूल' तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या 'रंगकर्मी' सन्मान आणि 'ध्यास' सन्मान  या दोन्ही पुरस्काराचे वितरण मंगळवारी एका शानदार समारंभात करण्यात आले. चैत्र चाहूल तर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या या विशेष पुरस्काराचे यंदाचे १२ वे वर्षे आहे.'चैत्रचाहूल' चा रंगकर्मी सन्मान ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर नाडकर्णी यांच्या हस्ते दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला.गतिमंद मुलांसाठी बालनाट्य चळवळ चालवणाऱ्या कांचन सोनटक्के यांना ध्यास सन्मान प्रदान करण्यात आला. २५ हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.कर्णबधिर, अपंग मुलांसाठी सुरु केलेली नाट्य चळवळ म्हणजे आयुष्याचा ध्यास असल्याच्या भावना कांचन सोनटक्के यांनी यावेळी व्यक्त केल्या. या पुरस्काराने कामाची उमेद वाढली आहे आणि पुढे कार्य करण्याचा ध्यासही वाढला आहे, असेही कांचन सोनटक्के यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. नाटकाचा वापर थेरपी म्हणून करणाऱ्या सोनटक्के बाई आगळ्याच आहेत.त्यांचे कार्य चकीत करणारे आहे.त्यांनी नाटकांतून अपंगांमध्ये निर्माण केलेला आत्मविश्वास जवळून बघितला आहे असे कमलाकर नाडकर्णी यांनी सांगितले. आगामी वर्षभरात चंद्रकांत कुलकर्णी यांनी एक प्रायोगिक तर सोनटक्के यांनी गतिमंद मुलांच्या समस्यांवर नाटक सादर करावे, अशी अपेक्षा नाडकर्णी यांनी व्यक्त केली. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर सोनटक्के यांच्या हस्ते शफाअत खान आणि प्रदीप मुळ्ये यांना संगीत अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल गौरवण्यात आले.

Web Title: Gaurav, Chandrakant Kulkarni, Kanchan Sontakke, 'Chaitra Shonlog'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.