होशियार रहना नगर में ‘चरणदास चोर’ आवेगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 17:26 IST2017-11-13T10:03:55+5:302017-11-13T17:26:31+5:30

‘होशियार रहना नगर में चोर आवेगा...जागृत रहना नगर में चोर आवेगा’ या संत कबीरांच्या दोह्याप्रमाणे चरणदास चोर मजल दरमजल ...

Be smart, there will be 'Charandas Thief' in the city | होशियार रहना नगर में ‘चरणदास चोर’ आवेगा

होशियार रहना नगर में ‘चरणदास चोर’ आवेगा

ोशियार रहना नगर में चोर आवेगा...जागृत रहना नगर में चोर आवेगा’ या संत कबीरांच्या दोह्याप्रमाणे चरणदास चोर मजल दरमजल करत मुंबईच्या मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यावर येऊन ठेपलाय. त्यामुळे सिनेरसिकांना या चरणदास चोराची भीती वाटण्याएवजी उत्सुकताच जास्त लागली आहे. गेल्या काही दिवसापासून चरणदास चोर या मराठी चित्रपटाचे अनेक पोस्टर्स सोशल मिडीया वरून वायरल होत आहेत. कधी रेल्वेच्या रूळांवर पडलेली एक रंगीबेरंगी पत्र्याची ट्रंक तर कधी तीच ट्रंक एका नावेतून तलावात विहार करताना दिसते...कधी पुण्याच्या शनिवार वाड्याजवळ तर कधी मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर कट्ट्यावर पडलेली दिसत होती. बरं...या ट्रंकमध्ये नेमकं काय आहे? ती अशी इथे-तिथे का पडलेली आहे? असे अनेक प्रश्न हे पोस्टर पाहून पडले असतानाच या ट्रंकेचं नाव ‘श्यामराव’ असल्याचं समजतंय. आता सोशल मिडीयावर ‘चरणदास चोर’ चा पहीला मोशन पोस्टर झळकलाय आणि या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखिनच वाढली.
 
या रंगेबिरंगी ट्रंकची उशी करून मरीन ड्राईव्हच्या समुद्रकिनारी कट्ट्यावर भर उन्हात गॉगल घालून पहुडलेला एक तरूण दिसतोय. सोबतीला ‘होशियार रहना नगर मे चोर आवेगा…’ या संत कबिरांच्या पंक्ती आणि अचानक तिथे प्रकटलेला कावळा, आदी गोष्टींमुळे चरणदास चोर या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखिनच ताणली जातेय. पेटीवर डोक ठेवून झोपलेला तरूणच चरणदास आहे? की चोरापासून त्या ट्रंकेचं तो रक्षण करतोय? मध्येच आलेला कावळा 'झुठ बोले कौवा काटे' भावनेने आला तर नाही ना? आणि नेमकं त्या ट्रंकेत आहे तरी काय ? असे अनेक प्रश्न हा मोशन पोस्टर पाहून पडत आहेत. एक मात्र नक्की, या मोशन पोस्टरमुळे चरणदास चोर या चित्रपटाची ढंग विनोदी आहे हे समजतंय. पण नेमकं त्या रंगेबिरंगी ‘श्यामराव’ नामक ट्रंकेत दडलंय काय आणि चरणदास चोर कोण?  या प्रश्नाचं नेमकं उत्तर येत्या २२ डिसेंबर रोजी युनीट प्रोडक्शन निर्मित श्याम महेश्वरी दिग्दर्शित आणि संजू होलमुखे यांचे क्रीएटीव्ह दिग्दर्शन असलेल्या चरणदास चोर हा चित्रपट चित्रपटगृहात पाहूनच मिळणार आहे.

Web Title: Be smart, there will be 'Charandas Thief' in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.