अक्षय म्हात्रे झळकणार लूज कंट्रोल या मराठी चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2017 14:27 IST
अक्षय म्हात्रेने सावर रे या मराठी मालिकेत तर युथ या मराठी चित्रपटात काम केले होते. मराठीत प्रसिद्धी मिळाल्यानंतर तो ...
अक्षय म्हात्रे झळकणार लूज कंट्रोल या मराठी चित्रपटात
अक्षय म्हात्रेने सावर रे या मराठी मालिकेत तर युथ या मराठी चित्रपटात काम केले होते. मराठीत प्रसिद्धी मिळाल्यानंतर तो हिंदी इंडस्ट्रीकडे वळला. सध्या तो पिया अलबेला या हिंदी मालिकेत काम करत आहे. पहिलीच हिंदी मालिका राजेश्री प्रोडक्शनची मिळाल्यामुळे सध्या तो खूपच खूश आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक हिंदी नाटकांमध्ये काम केले असल्याने त्याला अनेक महिन्यांपासूनच हिंदीत काम करायचे होते. तो सध्या पिया अलबेला या मालिकेत नरेन ही भूमिका साकारत आहे.अक्षयने या मालिकेत काम करण्यासोबतच एका मराठी चित्रपटात झळकणार आहे. लूज कंट्रोल असे या चित्रपटाचे नाव असून हा एक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात तो एका कॉलेज युवकाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत भाऊ कदम, कुशल बद्रिकेसारखे कॉमेडीमधील दिग्गज कलाकार झळकणार आहेत. तसेच या चित्रपटात शशांक शेंडेंची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण संपूर्ण झालेले असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाविषयी अक्षय सांगतो, "मी याआधीही मराठी चित्रपटात काम केले आहे. पण पहिल्यांदाच मी कोणत्याही चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत असल्याने या चित्रपटासाठी मी खूप उत्सुक आहे. या चित्रपटात मी कॉलेज युवकाची भूमिका साकारत असून या चित्रपटाचे सगळे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी मी खूप उत्सुक आहे. या चित्रपटाची टीम खूप चांगली असून भाऊ कदम, कुशल बद्रिके यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता."