Join us

किम कर्दाशियासोबत घ्यायचाय का सेल्फी ?

By admin | Updated: July 13, 2015 02:23 IST

मॅ डम तुसाद म्युझियममध्ये जगातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तिरेखांचे मेणाचे पुतळे बनवले आहेत. त्यात हॉलीवूडमधील स्टार्ससोबतच बॉलीवूडच्याही कलाकारांचे पुतळे आहेत

मॅ डम तुसाद म्युझियममध्ये जगातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तिरेखांचे मेणाचे पुतळे बनवले आहेत. त्यात हॉलीवूडमधील स्टार्ससोबतच बॉलीवूडच्याही कलाकारांचे पुतळे आहेत. यात किम कर्दाशिया हिचेही नाव जोडले गेले आहे. या पुतळ्यात किम एक सेल्फी घेताना दिसत आहे. यापूर्वी कोणाचाही पुतळा या पोजमध्ये बनवण्यात आलेला नाही. एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे, ज्यात पुतळ्याच्या हातातील फोन खरा आहे. याचा फायदा असा आहे की, पुतळ्यासोबत त्यांना सेल्फी घेता येईल. त्यामुळे ते नेहमी सांभाळून ठेवू शकतात. पुतळ्याला दाखवण्यात आलेला ड्रेस तिने इटलीमध्ये घातला होता. किमने ट्विट केले आहे, की मी अजून वाट पाहू शकत नाही. मला लवकरच या ड्रेससाठी फिट व्हायचे आहे. याच पुतळ्यासोबत मलाही एक सेल्फी घ्यायचा आहे.