Join us
Daily Top 2Weekly Top 5

'धाकड'साठी सज्ज होतेय कंगना राणौत, शेअर केला प्रोस्थेटिक मेकअपचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 11:02 IST

कंगना राणौतने नुकतेच थलाइवी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. आता ती धाकड चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे.

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतने नुकतेच थलाइवी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. आता ती धाकड चित्रपटात दिसणार आहे आणि सध्या ती या चित्रपटाच्या तयारीत व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वी तिने एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात ती धाकड चित्रपटासाठी फिजिकली तयार होताना दिसत होती. गेल्या बऱ्याच काळापासून ती मनाालीतील तिच्या घरी आहे आणि नुकतेच तिने तिचा प्रोस्थेटिक मेजरमेंट सेशन पूर्ण केले आहे.

या प्रोस्थेटिक सेशनदरम्यानचे फोटो कंगना राणौतने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोत कंगना तिच्या चेहऱ्यावर प्रोस्थेटिक्स लावताना दिसत आहे. काही एक्सपर्टने यात तिची मदत केली आहे. फोटो शेअर करत कंगनाने लिहिले की, आज धाकडसाठी प्रोस्थेटिक मेजरमेंट पूर्ण केले, चित्रपटाच्या शूटिंगला जानेवारी महिन्यात सुरूवात केली जाणार आहे.

कंगनाने लिहिले की, भारतीय सिनेमाच्या एका नवीन युगाला सुरूवात होत आहे ज्यात सर्वात पहिली महिला मुख्य भूमिकेत स्पाय एक्शन थ्रिलर करताना दिसणार आहे. ही खास संधी देण्यासाठी मी टीमची आभारी आहे. 

धाकडमधील कंगनाचा लूक आधीच रिलीज करण्यात आला आहे. यात ती दमदार अंदाजात दिसली आहे. धाकडसाठी कंगना खूप उत्साही आहे.

 कंगना राणौतचा आगामी चित्रपट थलाइवीमध्ये ती जयललिताच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील तिचा लूक आणि पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे.

आता तिचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. थलाइवीसाठी कंगनाने तिचे वजन वाढविले होते आणि या चित्रपटासाठी देखील तिने प्रोस्थेटिक मेकअपचा वापर केला होता.

टॅग्स :कंगना राणौत