Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 23:47 IST2025-12-07T23:32:21+5:302025-12-07T23:47:33+5:30
Gaurav Khanna Win BB 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेवर गौरव खन्नाने नाव कोरलं आहे. मराठमोळ्या प्रणित मोरेचं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न हुकलं आहे

Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
'बिग बॉस १९'ची ग्रँड फिनाले आज संपन्न झाली. या ग्रँड फिनालेमध्ये गौरव खन्नाने (Gaurav Khanna) बाजी मारली आहे. गेल्या १०० दिवसांपासून 'बिग बॉस १९' शो प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेत आहे. 'बिग बॉस १९'मध्ये फरहान भट, तान्या मित्तल, प्रणित मोरे, गौरव खन्ना, अमाल मलिक हे पाच जण टॉप ५ फायनलिस्ट होते. या सर्वांवर मात करुन गौरव खन्नाने 'बिग बॉस १९'वर नाव कोरलं आहे. त्यामुळे सर्व सह-स्पर्धकांनी आणि चाहत्यांनी गौरवचं अभिनंदन केलं आहे.
गौरवने बिग बॉस १९ च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
'बिग बॉस १९'मध्ये गौरव खन्ना सुरुवातीपासूनच त्याचा शांत तरीही हुशार स्वभावाने चर्चेत होता. गौरव भांडण सोडवण्याचा प्रयत्न करायचा. याशिवाय कोणाशी काही भांडण झालं तर गौरव खन्ना त्याची मर्यादा ठेऊन बोलायचा. उगाच आकांडतांडव करायचा नाही. शेवटपर्यंत गौरवने त्याच्या खेळाने सर्वांचं लक्ष वेधलं. त्याचाच परिणाम म्हणजे, गौरव खन्नाने 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.
गौरवचा खास मित्र प्रणित मोरेने त्याचं हार्दिक अभिनंदन करुन त्याचा आनंद व्यक्त केला आहे. टीव्ही इंडस्ट्रीत गेली २० वर्ष काम करत असल्याने गौरवला चाहत्यांचा खूप सपोर्ट होता. चाहत्यांच्या प्रेमामुळेच गौरवने बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कौरलं आहे.
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेची चर्चा
'बिग बॉस १९'चा ग्रँड फिनाले शानदार पद्धतीने पार पडला. यावेळी घराबाहेर गेलेले सर्व स्पर्धक 'बिग बॉस १९'मध्ये सहभागी झाले होते. सर्वांनी उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या. याशिवाय 'बिग बॉस १९'मधील टॉप ५ स्पर्धकांचं कुटुंबही उपस्थित होतं. प्रणित मोरेची आई-बाबा आणि भाऊ सहभागी होते. मालतीनेही प्रणित आणि तिच्या भांडणावर पडदा टाकला. याशिवाय घराबाहेर आल्यावर प्रणितला भेटण्याचं आश्वासन दिलं.