Dhurandhar Fa9la Song: अक्षय खन्नाचा 'तो' एक प्रश्न आणि व्हायरल झालं 'धुरंधर'मधलं गाणं; काय होता किस्सा

By देवेंद्र जाधव | Updated: December 9, 2025 10:58 IST2025-12-09T10:56:38+5:302025-12-09T10:58:01+5:30

धुरंधर सिनेमातलं ते गाणं व्हायरल होण्यामागे अक्षय खन्नाचं योगदान काय होतं. वाचून तुम्हीही थक्क व्हाल

Dhurandhar movie viral Song Fa9la flipperachi Akshaye Khanna ranveer singh | Dhurandhar Fa9la Song: अक्षय खन्नाचा 'तो' एक प्रश्न आणि व्हायरल झालं 'धुरंधर'मधलं गाणं; काय होता किस्सा

Dhurandhar Fa9la Song: अक्षय खन्नाचा 'तो' एक प्रश्न आणि व्हायरल झालं 'धुरंधर'मधलं गाणं; काय होता किस्सा

सध्या रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सिनेमातील अक्षय खन्नाने साकारलेल्या रहमान डकैत या खलनायकाचं खूप कौतुक होतंय. खलनायक असूनही अक्षयच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. अक्षय खन्नाने 'धुरंधर' सिनेमात केलेला डान्स आणि त्याच्यावर चित्रित झालेलं गाणं चांगलंच व्हायरल झालं आहे. हे गाणं व्हायरल होण्यामागे अक्षय खन्नाचंच योगदान आहे. कसं? जाणून घ्या.

अक्षय खन्नाचा तो प्रश्न आणि व्हायरल झालं गाणं

'धुरंधर'मध्ये रहमान डकैतच्या भावाची भूमिका साकारणारा अभिनेता दानिश पंडरने याविषयी खास खुलासा केला. तो म्हणाला, ''आमचे दिग्दर्शक आदित्य धर कोरिओग्राफर विजय गांगुली यांच्याशी बोलत होते. सिनेमात जे बॅकग्राऊंड डान्सर दिसलेत त्याची कोरिओग्राफी विजय यांनी केली आहे. याचवेळी अक्षय सरांना आदित्य शॉट समजावत होते. तेव्हा अक्षय सरांनी विचारलं, मी इथे नाचू शकतो का? या प्रश्नावर आदित्य म्हणाले- तुला आवडेल ते कर.''




''त्यानंतर जे झालं ते चकित करणारं होतं. अक्षय खन्नांनी सीनमध्ये प्रवेश घेतला आणि उत्स्फुर्तपणे डान्स करायला सुरुवात केली. त्यांचा डान्स त्यांनी स्वतःच कोरिओग्राफ केला होता. जे काय घडतंय ते पाहून सर्वांना आनंद झाला होता. सीन संपल्यावर अक्षय सरांसाठी टाळ्यांचा कडकडाट झाला'', अशाप्रकारे दानिश पंडरने हा किस्सा सांगितला.

अक्षय खन्नाने विचारलेल्या त्या एका प्रश्नामुळे त्याला डान्स करता आला आणि आज हा डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्या प्रेक्षकांनी 'धुरंधर' सिनेमा बघितला आहे त्या सर्वांना अक्षय खन्नाला असं नाचताना बघून चांगलाच आनंद झाला आहे. 'धुरंधर' सिनेमाने ३ दिवसात १०० कोटींहून जास्त व्यवसाय केला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Web Title : अक्षय खन्ना के सवाल से 'धुरंधर' का गाना हुआ वायरल: कहानी

Web Summary : अक्षय खन्ना के एक सवाल से 'धुरंधर' में उनका सहज नृत्य वायरल हो गया। उनके स्व-नृत्य ने सभी को चकित और खुश कर दिया। फिल्म ने 3 दिनों में ₹100 करोड़ से अधिक की कमाई की।

Web Title : Akshaye Khanna's question made 'Dhurandhar' song viral: The story

Web Summary : Akshaye Khanna's impromptu dance in 'Dhurandhar,' sparked by a simple question, went viral. His character's dance, self-choreographed, surprised and delighted the crew, becoming a hit with audiences. The film earned over ₹100 crore in 3 days.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.