धर्मेंद्र यांच्या यशाची गणितं बदलणारा सिनेमा; 'त्या' आयकॉनिक भूमिकेमुळे मिळाला 'ही-मॅन'चा टॅग, तुम्ही पाहिलाय का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 16:23 IST2025-11-11T16:18:52+5:302025-11-11T16:23:16+5:30
धर्मेंद्र यांच्या यशाची गणितं बदलणारा सिनेमा, ५० आठवडे बॉक्स ऑफिसवर चालला,मिळाला 'ही-मॅन'चा टॅग, तुम्ही पाहिला?

धर्मेंद्र यांच्या यशाची गणितं बदलणारा सिनेमा; 'त्या' आयकॉनिक भूमिकेमुळे मिळाला 'ही-मॅन'चा टॅग, तुम्ही पाहिलाय का?
Dharmedra: बॉलिवूडमध्ये स्टारडम हे फारसे टिकत नाही. पण धर्मेंद्र यांना मिळालेले स्टारडम आजतागायत कोणाला मिळाले नाही. बॉलिवूडचे 'ही मॅन' अशी ओळख मिळवणारे प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांनी गेली अनेक दशकं बॉलिवूडवर राज्य केलं. धर्मेंद्र यांनी आजवर अनेक अजरामर सिनेमे बॉलिवूडला दिले.त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात १९६० मध्ये आलेल्या दिल भी तेरा हम भी तेरे या सिनेमातून केली.१९६१ ते ६७ या कालावधीत त्यांनी अनेक सिनेमांमध्ये सह कलाकार म्हणून काम केलं.मात्र, शोले सिनेमा त्यांच्या करिअरसाठी मैलाचा दगड ठरला. परंतु, तुम्हाला माहितीये का धर्मेंद्र यांच्या कारकिर्दीतील असा एक चित्रपट ज्याची तुलना शोलेसोबत केली जाते. शिवाय याच चित्रपटामुळे इंडस्ट्रीत त्यांना हि-मॅन म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
धर्मेंद्र यांना मोठ्या संघर्षानंतर अखेर १९६० मध्ये "दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून पदार्पण केलं. मात्र,त्यांना पत्थर के फूल या चित्रपटाने खरी ओळख मिळवून दिली. हा चित्रपट त्यांच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला. १९६६ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रचंड हिट ठरला. एका मुलाखतीत स्वत: धर्मेंद्र यांनी या चित्रपटाची तुलना शोलेसोबत केली होती.
असा मिळाला ही-मॅनचा टॅग
फूल और पत्थर या सिनेमात धर्मेंद्र यांनी हिरो म्हणून भूमिका साकारली.धर्मेंद्र यांच्या अॅक्शन पटांमुळे त्यांना हिंदी सिनेसृष्टीचा हीमॅन असं म्हटलं जाऊ लागलं.याच चित्रपटामुळे ते बिरुद त्यांच्या नावापुढे चिकटलं ते कायमचंच. या चित्रपटातील धर्मेंद्र यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या शरीरयष्टीने आणि शरीरयष्टीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.