​युलिया वेंटर म्हणते, हिंदी चित्रपटात काम करण्यास उत्सुक नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2017 19:14 IST2017-02-04T13:44:20+5:302017-02-04T19:14:20+5:30

बॉलिवूडचा दंबग स्टार सलमान खान याची कथित गर्लफ्रें ड युलिया वेंटर लवकरच बॉलिवूडमध्ये पदापर्ण करेल अशा बातम्या अनेकदा व्हायरल ...

Yulea Venter says, Hindi is not keen to work in Hindi film | ​युलिया वेंटर म्हणते, हिंदी चित्रपटात काम करण्यास उत्सुक नाही

​युलिया वेंटर म्हणते, हिंदी चित्रपटात काम करण्यास उत्सुक नाही

लिवूडचा दंबग स्टार सलमान खान याची कथित गर्लफ्रें ड युलिया वेंटर लवकरच बॉलिवूडमध्ये पदापर्ण करेल अशा बातम्या अनेकदा व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी युलियाने सलमान खानच्या गाण्यावर एका कार्यक्रमात परर्फामन्स दिल्याने अशा बातम्यांना उत आला होता. मात्र युलियाने आपल्या करिअरबद्दलचा खुलासा केला असून यामुळे तिच्या चाहत्यांना निराश व्हावे लागू शकते. 

रोमानियन टीव्ही निवेदिका व अभिनेत्री युलिया वेंटर ही लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करताना दिसणार आहे. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रेस कॉन्फरंसमध्ये मीडियाशी संवाद साधताना युलियाने आपल्या करिअरबद्दलचा खुलासा केला. युलिया म्हणाली, मला हिंदी चित्रपटात अभिनेत्री म्हणून करिअर घडविण्यात कोणताच इंट्रेस नाही. मी लॅक्मे फॅशन वीकमध्ये यासाठी रॅम्पवर आले, कारण मला याचा अनुभव घ्यायाचा होता. माझ्या काही इच्छा आहेत त्या मला पूर्ण करायच्या आहेत. त्यासाठी मी हे करीत आहे. याचा अर्थ असा नाही की मी यात आपले करिअर घडविणारच. मी अनेक रोमानियन स्टेज शो केले आहेत. 



मागील काही दिवसांपासून युलिया वेंटर भारतात असून ती हिंदी व पंजाबी गाण्याचे प्रशिक्षण घेत होती. मागील वर्षी युलियाचा हिमेश रेशमियासोबत एक अल्बमही रिलीज झाला आहे. दुसरीकडे सलमान खान व युुलिया वेंटर यांच्या संबंधाच्या बातम्या चांगल्याच व्हायरल होत आहे. सलमानच्या वाढदिवसाच्या आधी आधी भारतात आलेली युिलया खान कुटुंबियांसोबत चांगलीच रमली आहे. खान कुटुंबियांच्या खाजगी कार्यक्रमात तिची हजेरी चर्चेत आली आहे. मात्र युलियाने हिंदी चित्रपटाबद्दलचा खुलासा करून अनेक प्रश्न निर्माण करण्याची संधी दिली आहे. आता आगामी काळात तिला या सर्व प्रश्नाची उत्तरे द्यावी लागणार आहे. हे देखील तेवढेच खरे. 

Web Title: Yulea Venter says, Hindi is not keen to work in Hindi film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.