संजय दत्तवर का आली होती अमेरिकेच्या रस्त्यांवर भीक मागण्याची वेळ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 20:26 IST2018-06-14T14:56:47+5:302018-06-14T20:26:47+5:30

‘संजू’चे गाणे ‘कर हर मैदान फतह...’ हे गाणे आपण पाहिले़ या गाण्यातील एक सीन आहे. होय, संजय दत्तच्या भूमिकेतील ...

Why was Sanjay Dutt begging on American roads? | संजय दत्तवर का आली होती अमेरिकेच्या रस्त्यांवर भीक मागण्याची वेळ?

संजय दत्तवर का आली होती अमेरिकेच्या रस्त्यांवर भीक मागण्याची वेळ?

ंजू’चे गाणे ‘कर हर मैदान फतह...’ हे गाणे आपण पाहिले़ या गाण्यातील एक सीन आहे. होय, संजय दत्तच्या भूमिकेतील रणबीर कपूर अमेरिकेच्या रस्त्यांवर भीक मागतोय, असा एक सीन या गाण्यात दाखवला गेला आहे. गाण्यात दाखवलेल्या या एका सीनने संजयच्या चाहत्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण केला आहे. संजय दत्तवर खरचं ही वेळ आली होती का, असा हा प्रश्न आहे. आता ‘संजू’चे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. ही घटना संजय दत्त अमेरिकेत ड्रग्ज रिहॅब सेंटरमध्ये होता, त्यावेळची असल्याचे हिरानी यांनी सांगितले.
ड्रग्जच्या व्यसनाने संजयला इतका जबर विळखा घातला होता की, हे व्यसन सोडवण्यासाठी संजयला प्रचंड त्रास सहन करावा लागला. एकदा तो अमेरिकेच्या या रिहॅब सेंटरमधून पळाला. त्याला त्याच्या मित्राला भेटायचे होते. हा मित्र म्हणजे कुमार गौरव होता. पण संजय जवळ बसचे तिकिट खरेदी करायला पैसे नव्हते. या पैशांसाठी संजयने अमेरिकेच्या रस्त्यावर भीक मागितली होती. रिहॅब सेंटरमधून पळाल्यानंतर अनेक रात्री त्याला अमेरिकेच्या रस्त्यावर घालवल्या लागल्या होत्या, असे राजकुमार हिरानींनी सांगितले.
हिरानींनी ‘संजू’ या चित्रपटाचे एक पोस्टर अलीकडे शेअर केले होते. यात संजय बनलेला रणबीर कपूर आपल्या वडिलांसह कारमध्ये बसलेला दिसतो आहे आणि बाहेर फोटोग्राफर आहे. हा सीन संजयचा पहिला चित्रपट ‘रॉकी’च्या प्रीमिअरवेळचा आहे. ‘रॉकी’च्या रिलीजच्या चार दिवसांपूर्वी संजयची आई नरगिस हिचे निधन झाले होते. आईच्या निधनाने संजय कमालीची नव्हर्स आणि दु:खी होता. आईला गमावल्याचे दु:ख त्याच्या चेह-याभर पसरले होते. ‘रॉकी’च्या प्रीमिअरवेळी नरगिस यांच्यासाठीची खुर्ची खाली ठेवण्यात आली होती.
 
ALSO READ : ‘संजू’साठी कठीण होते ‘हे’ काम!!

रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘संजू’ नावाचा हा चित्रपट येत्या २९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. तूर्तास या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे.संजय दत्तचे नशेच्या आहारी गेल्यानंतरचे आयुष्य, कारागृहातील दिवस, नातेवाइकांचा अबोला, दहशतवादी अशा काही घटना या चित्रपटात  दाखविल्या जातील, ज्या तुम्हाला विचार करण्यास भाग पाडतील. या बायोपिकमध्ये अभिनेता  मनीषा कोइराला, परेश रावल, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा आणि सोनम कपूर आदी कलाकार आहेत. 

Web Title: Why was Sanjay Dutt begging on American roads?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.