Watch Video : रणवीर सिंगचे नवे टॅलेंट आले समोर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2017 18:34 IST2017-03-24T13:04:00+5:302017-03-24T18:34:00+5:30

​आपल्यातील प्रतिभेच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करणारा अभिनेता रणवीर सिंग हा नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतो.

Watch Video: Ranveer Singh's new talent comes in front !! | Watch Video : रणवीर सिंगचे नवे टॅलेंट आले समोर!!

Watch Video : रणवीर सिंगचे नवे टॅलेंट आले समोर!!

ल्यातील प्रतिभेच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करणारा अभिनेता रणवीर सिंग हा नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतो. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, रणवीर हा अतिशय अ‍ॅक्टिव्ह अभिनेता असून, संधी मिळेल तेव्हा तो त्याच्यातील कौशल्य त्याच्या फॅन्सना दाखवित असतो. असेच काहीसे कौशल्य पुन्हा एकदा त्याने दाखविले असून, ‘ट्रॅप्ड’ या चित्रपटाच्या टीमसोबत त्याने एक ‘रॅपिंग’ गायिले आहे. अभिनेता राजकुमार राव याने हा रॅपिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, रणवीरच्या या नव्या कौशल्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 

रणवीर नुकताच ‘ट्रॅप्ड’च्या टीमला भेटला. विक्रमादित्य मोटवानी आणि राजकुमार राव यांच्यासोबत त्याने फेसबुक लाइव्हदेखील केले. यावेळी रणवीरने त्यांच्यासोबत ‘रॅपिंग’ केले. राजकुमार रावने रणवीरसोबतचा हा व्हिडिओ लगेचच ट्विटर हॅण्डलवर शेअर केला. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ट्रपरॅप’ उद्या येत आहे, हा बघा ‘ट्रॅप्ड’चा बोनस ट्रॅक! 

#TrapRap coming tomorrow. Bonus track from #Trapped. @AlokanandaD & #AnishJohn u guys r genius. I'm in love with the song. Rap of the season pic.twitter.com/DhOxho00hB— Rajkummar is TRAPPED (@RajkummarRao) March 23, 2017 ">http://

}}}}
जर तुम्ही या व्हिडीओचे निरीक्षण केल्यास तुमच्या लक्षात येईल की, रणवीर राजकुमार च्या नावालाच लिरिक्स म्हणून गात आहे. त्याचबरोबर यास बॅकग्राउंड म्युझिक ऐकावयास मिळत आहे. रणवीरने राजकुमार राव याचा ‘ट्रॅप्ड’ बघितल्यानंतर तो त्याच्या जणू काही प्रेमातच पडला होता. सोशल मीडियावर राजकुमार राव याचे गोडवे गाताना त्याने एकापाठोपाठ एक असे ट्विट केले होते. 

राजकुमार राव याचा ‘ट्रॅप्ड’ हा एक थ्रिलर चित्रपट असून, एक व्यक्ती स्वत:च्या चुकीने त्याच्याच घरात कित्येक दिवस बंद होतो. त्यानंतर तो कशा पद्धतीने जीवन जगतो, याविषयीची स्टोरी यात दाखविण्यात आली आहे. राजकुमार राव याने या चित्रपटासाठी भरपूर मेहनत घेतली असल्याचे त्याने सांगितले होते. हा चित्रपट रिलीज झाला आहे. 

Web Title: Watch Video: Ranveer Singh's new talent comes in front !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.