लेकाचं नाव कधी रिव्हील करणार? पापाराझींच्या प्रश्नावर अभिनेता विकी कौशल म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 16:49 IST2025-12-02T16:48:29+5:302025-12-02T16:49:03+5:30
गेल्या महिन्यातच कतरिना कैफने मुलाला जन्म दिला.

लेकाचं नाव कधी रिव्हील करणार? पापाराझींच्या प्रश्नावर अभिनेता विकी कौशल म्हणाला...
अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी काही दिवसांपूर्वीच गुडन्यूज दिली. ७ नोव्हेंबर रोजी कतरिनाने गोंडस मुलाला जन्म दिला. विकीच्या घरी 'छावा'चं आगमन झालं. कौशल कुटुंबात तेव्हापासूनच आनंदाचं वातावरण आहे. विकी आणि कतरिनाने लेकाचं नाव काय ठेवलं हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. नुकतंच विकीने यावर प्रतिक्रिया दिली.
विकी कौशल काही दिवसांपूर्वी एका इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. तेव्हा पापाराझींनी त्याला कॅमेऱ्यात कैद केले. इव्हेंटमध्ये विकी कौशल बाबा होण्यावर म्हणाला, "मी बाबा झालो हा या वर्षातला माझ्यासाठी सर्वात खास क्षण होता. ही खूपच जादुई भावना आहे. मला नेहमीच असं वाटायचं की जेव्हा ती वेळ येईल तेव्हा मी खूप भावनिक आणि उत्साही असेन. पण जेव्हा ती वेळ खरंच आली तेव्हा तो क्षण अगदीच आनंददायी होता."
दरम्यान विकीला पापाराझींनी मुलाचं नाव कधी सांगणार? असं विचारलं. त्यावर विकी म्हणाला, 'लवकरच सांगतो'. विकी कौशल आणि कतरिनाने ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्नगाठ बांधली होती. राजस्थानमधील एका पॅलेसमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. कतरिनाच्या प्रेग्नंसीची गेल्यावर्षीपासूनच चर्चा होती. अखेर तिने दोन महिन्यांपूर्वी प्रेग्नंसीची घोषणा केली होती. विकी-कतरिना आयुष्याच्या या नवीन टप्प्यावर पोहोचले आहेत त्यामुळे चाहते त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
तर दुसरीकडे सोनम कपूर दुसऱ्यांदा आई होणार आहे. पहिला मुलगा वायूच्या जन्मानंतर आता ती पुन्हा प्रेग्नंट आहे. तसंच अभिनेत्री कियारा अडवाणीनेही काही महिन्यांपूर्वी लेकीला जन्म दिला. 'सयाराह' असं तिचं नाव ठेवण्यात आलं. याशिवाय अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा हेही नुकतेच आईबाबा झाले आहेत. पत्रलेखाने मुलीला जन्म दिला.