song launch of film running shadi.
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2017 14:26 IST
अभिनेत्री तापसी पन्नू व अमित संध यांच्या प्रमुख भूमिका असणारा ‘रनिंग शादी डॉट कॉम’ हा चित्रपटाची एक गाण नुकतेच लाँच करण्यात आले. या प्रसंगी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
song launch of film running shadi.
अभिनेत्री तापसी पन्नू व अमित संध यांच्या प्रमुख भूमिका असणारा ‘रनिंग शादी डॉट कॉम’ हा चित्रपटाची एक गाण नुकतेच लाँच करण्यात आले. या प्रसंगी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. शूजित सरकार प्रोडक्शनच्या या चित्रपटाचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू होते. याआधी या चित्रपटाच्या ट्रेलर प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. प्रेक्षकांच्या उत्सुकता वाढवण्यासाठी चित्रपटाच्या टीमने मेनरलेस मजनूं ही गाण लाँच केले. गाण्याच्या लाँच दरम्यान तापसी आणि अमितची केमिस्ट्री दिसून आली. एका लहान शहरातील तरुण-तरुणीची ही लव्ह स्टोरी आहे. हा एक रोमाँटिक, कॉमेडी चित्रपट आहे. गुड्डू रंगीला अर्थात अमित संध यावेळी मस्तीच्या मूडमध्ये दिसला. चित्रपटात तापसी आणि अमित तरुण जोडप्यांना लग्न व जोडीदार शोधून देण्यात मदत करतात. तसेच ज्या जेडप्यांना इंटरकास्ट मॅरेज करायचे आहे, त्यांना घरून पळून जाण्यात व त्यांचे लग्न लावून देण्यात मदत करतात.