कुंकू लावताना सोनम कपूरने आनंद आहुजाला केली ‘ही’ सूचना, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 19:09 IST2018-05-08T13:35:20+5:302018-05-08T19:09:43+5:30

सोनम कपूर आणि आनंद आहुजाचे लग्न अतिशय थाटामाटात पार पडले. सध्या त्यांच्या लग्नातील एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यामध्ये सोनम आनंदला सूचना करताना दिसत आहे.

Sonam Kapoor blamed 'Kundu', 'this' instruction, watch video! | कुंकू लावताना सोनम कपूरने आनंद आहुजाला केली ‘ही’ सूचना, पाहा व्हिडीओ!

कुंकू लावताना सोनम कपूरने आनंद आहुजाला केली ‘ही’ सूचना, पाहा व्हिडीओ!

नम कपूर आणि आनंद आहुजाचे लग्न संपन्न झाले असून, या दोघांच्या एका खास क्षणाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आनंद सोनमच्या केसांच्या भांगेत कुंकूभरताना दिसत आहे. आता तुम्ही म्हणाल की, प्रत्येक लग्नात हा एक विधी म्हणून बघितला जातो. मग यात विशेष ते काय? तर या व्हिडीओचे वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा आनंद केसांच्या भांगेत कुंकू भरत असतो तेव्हाही त्याला काही सूचना दिल्या जातात. त्याला सांगितले जात आहे की, कुंकू थोडेसेच भर. तसेच या व्हिडीओमध्ये हीदेखील घोषणा केली जात आहे की, आता तुम्ही पती-पत्नी झाले आहात. या व्हिडीओमध्ये सोनम खूपच इमोशनल होतानाही दिसत आहे. 

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आनंदला सांगितले जात आहे, कुंकू लावायचे आहे. तसेच सोनमही त्याला सांगताना दिसत आहे की, फक्त थोडेसेच. यावेळी आनंद सोनमच्या गळ्यात मंगळसूत्र घालतानाही दिसत आहे. एवढ्यात मागून कोणीतरी म्हणतो की, सोनमजी अभिनंदन, आता लग्न पूर्ण झाले. तुम्ही मिस्टर अ‍ॅण्ड मिसेज् आहुजा बनल्या आहेत. हा सर्व विधी पार पडल्यानंतर सोनम आनंदच्या गालावर प्रेमाने एक चुंबनही घेताना दिसते. 
 

दरम्यान, सोनम कपूरच्या लग्नाचे रिसेप्शन आज रात्रीच पार पडणार आहे. ज्यामध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज उपस्थित राहण्याची शक्यता आहे. लग्नात महानायक अमिताभ बच्चन, आमिर खान, जॅकलिन फर्नांडिस, सैफ अली खान, करिना कपूर-खान यांच्यासह अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अतिशय थाटामाटात हा विवाह सोहळा पार पडला. 

Web Title: Sonam Kapoor blamed 'Kundu', 'this' instruction, watch video!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.