सलमा आगा यांना लाईफटाईम व्हिसा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2016 21:40 IST2016-05-30T16:10:59+5:302016-05-30T21:40:59+5:30
पाकिस्तानी वंशाच्या सुप्रसिद्ध गायिका व अभिनेत्री सलमा आगा सध्या आनंदात आहेत. या आनंदाचे कारण म्हणजे, भारत सरकारने सलमा यांना ...

सलमा आगा यांना लाईफटाईम व्हिसा!
प किस्तानी वंशाच्या सुप्रसिद्ध गायिका व अभिनेत्री सलमा आगा सध्या आनंदात आहेत. या आनंदाचे कारण म्हणजे, भारत सरकारने सलमा यांना लाईफटाईम व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी ही बातमी दिली आहे. यामुळे सलमा यांना कधीही भारतात येण्या-जाण्याची मुभा असेल. सलमा यांनी ओवरसीज सिटीजन आॅफ इंडियासाठी अर्ज दिला होता. यासंदर्भात सलमा लवकरच गृहमंत्री राजनाथ सिंह यांना भेटणार असल्याचे कळते. सध्या सलमा यांच्याकडे ब्रिटनचे नागरिकत्व आहे.सलमा यांनी अनेक हिंदी चित्रपटांना आवाज दिलाय. काही चित्रपटात त्यांनी अभिनयही केला आहे. ‘निकाह’मधील ‘दिल के अरमा आसुंओ में बह गये...’या गाण्यासाठी १९८२ मध्ये सलमा यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळाला होता.