वयाच्या ३३व्या वर्षी एग्ज फ्रिज करतेय रिया चक्रवर्ती, लग्न आणि मुलांबद्दल म्हणाली असं काही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 11:09 IST2025-12-09T11:08:27+5:302025-12-09T11:09:24+5:30
Rhea Chakraborty : अभिनेत्री रिया चक्रवर्ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरीच चर्चेत राहिली आहे. आता ती आयुष्यात पुढे सरकली असून तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे.

वयाच्या ३३व्या वर्षी एग्ज फ्रिज करतेय रिया चक्रवर्ती, लग्न आणि मुलांबद्दल म्हणाली असं काही
बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) तिच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा प्रोफेशनल आयुष्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. तिने स्वतःचा ब्रँड सुरू केला आहे आणि पॉडकास्टही करायला सुरुवात केली आहे. तिच्या 'चॅप्टर २' या पॉडकास्टमध्ये हुमा कुरेशी पाहुणी म्हणून आली होती, जिथे रिया तिच्यासोबत वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलली. तिने खुलासा केला की ती एग फ्रीझिंग करत आहे आणि त्यासाठी तिने स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्लाही घेतला आहे.
महिलांच्या आयुष्याबद्दल बोलताना रिया म्हणाली की, वयाच्या ३० व्या वर्षी महिलांना अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात, जसे की लग्न, मुले, कारण तुमची बायोलॉजिकल क्लॉक चालू असते. रियाने हुमाशी बोलताना सांगितले, ''माझे वय ३३ आहे आणि मी नुकतीच एग फ्रीझिंग करण्यासाठी स्त्रीरोगतज्ञाकडे गेले होते. मी हे करण्याचा विचार करत आहे. ही किती विचित्र गोष्ट आहे. तुमचे शरीर सांगत असते की तुम्हाला मुले करायला हवीत, पण मन म्हणते की तुमच्याकडे आधीच एक मूल आहे. तुमचा ब्रँड, तुमचा व्यवसाय आणि त्या मुलाचे तुम्हाला पालनपोषण करायचे आहे.''
लग्नाबद्दल म्हणालेली असं काही...
रिया चक्रवर्तीने यापूर्वी 'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'शी बोलताना सांगितले होते की, लग्नाच्या योग्य वयावर तिचा विश्वास नाही आणि आयुष्यात उशिरा लग्न करण्यावर तिला कोणताही आक्षेप नाही. महिलांवर लग्न आणि मुले जन्माला घालण्यासाठी असलेल्या दबावावरही तिने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, रिया सध्या कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसली नाहीये. ती सध्या तिच्या व्यवसाय आणि पॉडकास्टवर लक्ष केंद्रित करत आहे. ती आणि तिचा भाऊ मिळून व्यवसाय सांभाळतात, तर रियाच्या पॉडकास्टमध्ये अनेक मोठे सेलिब्रिटी आले आहेत, ज्यांच्यासोबत ती वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसते.