​वाचा: सुनेच्या ‘पर्पल लिप्स’वर अमिताभ यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2016 21:28 IST2016-05-30T15:58:34+5:302016-05-30T21:28:34+5:30

यंदा कान फिल्म फेस्टिवलमध्ये ऐश्वर्या रॉय बच्चन हिने लावलेली पर्पल लिपस्टिक चर्चेचा विषय ठरली. यंदा ऐश्वर्या रेड कार्पेटवर उतरली ...

Read: Amitabh's reaction to hearing 'Purple Lips' | ​वाचा: सुनेच्या ‘पर्पल लिप्स’वर अमिताभ यांची प्रतिक्रिया

​वाचा: सुनेच्या ‘पर्पल लिप्स’वर अमिताभ यांची प्रतिक्रिया

दा कान फिल्म फेस्टिवलमध्ये ऐश्वर्या रॉय बच्चन हिने लावलेली पर्पल लिपस्टिक चर्चेचा विषय ठरली. यंदा ऐश्वर्या रेड कार्पेटवर उतरली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्या सौंदर्याऐवजी तिच्या पर्पल लिप्सवर केंद्रीत झाल्या. काहींनी तिच्या पर्पल लिप्सची तारीफ केली तर काहींनी टीका. सोशल मीडियावर ऐश्वर्याच्या पर्पल लिप्सवर सर्वाधिक टीका झाली. ऐश्वर्याचा पती अभिषेक बच्चन याने ऐश्वर्या पर्पल लिप्समध्ये सुंदर दिसत होती, असे सांगून बायकोची पाठराखण केली. आता ऐश्वर्याचे सासरे म्हणजे मेगास्टार अमिताभ बच्चन यांनीही सूनेच्या पर्पल लिप्सवर प्रतिक्रिया दिली आहे.
एका मुलाखतीत अमिताभ यांना ऐश्वर्याचे पर्पल लिप्स आणि त्यावर होणारी टीका याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर  त्यात गैर काय? असा सवाल करीत अमिताभ ऐश्वर्याची पाठराखण करताना दिसले. ते इथेच थांबले नाहीत तर सोशल मीडियावरील टीका स्पोर्टली कशी घ्यायची, हा अप्रत्यक्ष सल्लाच जणू त्यांनी ऐश्वर्याला दिला. सोशल मीडियाने प्रत्येकाला अभिव्यक्त होण्याची संधी दिली आहे. यापूर्वी ही संधी नव्हती. अन्य लोक आपल्याबद्दल काय विचार करतात, हे आपल्याला आधी कळत नव्हते. कमीत कमी आता आपल्याला हे समजू शकते. सोशल मीडियाने प्रत्येकाला आवाज दिला.   स्वत:ला अभिव्यक्त करण्याची संधी दिली. यात चुकीचे काय? असे ते म्हणाले. आता सासºयाचा सल्ला ऐश्वर्या किती मनावर घेते ते बघूच!


 

Web Title: Read: Amitabh's reaction to hearing 'Purple Lips'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.