काही दिवसांपूर्वी गोव्याच्या इफ्फी फिल्म फेस्टिव्हलमध्ये रणवीर सिंग सहभागी झाला होता. त्यावेळी रणवीरने ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चाप्टर १' सिनेमाचा उल्लेख करुन त्याची नक्कल केली. 'कांतारा चाप्टर १' सिनेमात ऋषभच्या अंगात जेव्हा देवीचा संचार होतो, त्याचा उल्लेख रणवीरने भूत म्हणून केला होता. याशिवाय अत्यंत विचित्र पद्धतीने रणवीरने सर्वांसमोर त्या प्रसंगाची नक्कल केली होती. अखेर आता रणवीरने या संपूर्ण प्रकरणाविषयी माफी मागितली आहे.रणवीरचा माफीनामा
रणवीर सिंगने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करुन लिहिलंय की, ''माझा हेतू 'कांतारा' सिनेमातील ऋषभच्या अविश्वसनीय अभिनयाची दखल घेणं हा होता. एक अभिनेता म्हणून, मला माहीत आहे की, त्याने ज्या पद्धतीने तो विशिष्ट प्रसंग सादर केला, त्यासाठी त्याला किती मेहनत घ्यावी लागली असेल आणि म्हणूनच माझ्या मनात त्याच्याबद्दल खूप आदर आहे. मी नेहमीच आपल्या देशातील प्रत्येक संस्कृतीचा, परंपरेचा आणि श्रद्धेचा मनापासून आदर केला आहे. कोणाच्याही भावना दुखावल्या असल्यास, मी नम्रपणे माफी मागतो.''
Web Summary : Ranveer Singh apologized for mimicking Rishab Shetty's 'Kantara' performance at a film festival after facing backlash. He clarified his intention was to acknowledge Shetty's hard work and immense respect for Indian culture, traditions and beliefs. He regrets hurting sentiments.
Web Summary : रणवीर सिंह ने फिल्म फेस्टिवल में ऋषभ शेट्टी के 'कांतारा' प्रदर्शन की नकल करने पर माफी मांगी। उन्होंने कहा कि उनका इरादा शेट्टी की मेहनत को स्वीकारना था और वह भारतीय संस्कृति का सम्मान करते हैं। उन्होंने भावनाओं को ठेस पहुंचाने के लिए खेद व्यक्त किया।