​ रणबीर कपूरने जाहीरपणे विचारला प्रश्न, ‘विल यू मॅरी मी?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2018 15:35 IST2018-06-17T10:05:18+5:302018-06-17T15:35:18+5:30

आलिया  भट्ट व रणबीर कपूर या दोघांच्या रिलेशनशिपच्या बातम्या जोरात आहेत. अद्याप दोघांनीही या बातम्यांना दुजोरा दिलेला नाही. पण ...

Ranbir Kapoor asked the question, 'Will you marry me?' | ​ रणबीर कपूरने जाहीरपणे विचारला प्रश्न, ‘विल यू मॅरी मी?’

​ रणबीर कपूरने जाहीरपणे विचारला प्रश्न, ‘विल यू मॅरी मी?’

िया  भट्ट व रणबीर कपूर या दोघांच्या रिलेशनशिपच्या बातम्या जोरात आहेत. अद्याप दोघांनीही या बातम्यांना दुजोरा दिलेला नाही. पण चाहते मात्र त्यांच्या रिलेशनशिपच्या घोषणेकडे डोळे लावून बसले आहेत. अशाच चाहत्यांसाठी एक मजेशीर बातमी आहे. होय, रणबीर कपूरने लग्नाचा प्रस्ताव ठेवला आहे़ ‘विल यू मॅरी मी’,असा जाहीर प्रश्न रणबीरने सोशल मीडियावर विचारला आहे. पण थांबा़!!  तुम्ही उगाच तर्क काढण्यापूर्वी आम्ही काही स्पष्ट करू इच्छितो. होय, हा प्रश्न रणबीरने विचारला खरे. पण त्याचा हा प्रश्न आलियासाठी नव्हता तर दुस-याच कुणासाठी होता. 


त्याचे झाले असे की, एका फॅनने ट्विरवर रणबीरवरचे प्रेम व्यक्त केले़ आणि याच्याउत्तरादाखल मागचा पुढचा कुठलाही विचार न करता, रणबीरने ‘विल यू मॅरी मी?’ असा प्रश्न या फॅनला विचारून टाकला. सोबतच याच्यासोबत लॉफिंग स्माईली पोस्ट करून ही निव्वळ मस्ती असल्याचेही दर्शवले. आता त्याचा इशारा कुणाकडे होता की तो खरचं निव्वळ मस्ती करत होता, हे त्याचे त्याला ठाऊक. पण आलिया यावर कशी रिअ‍ॅक्ट होते, ते पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.
रणबीरचा  आगामी चित्रपट 'संजू'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. यात रणबीरने केलेल्या संजूच्या भूमिकेचे सगळीकडे कौतूक होताना दिसतेय. राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित आहे. यात रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारतोय. 

ALSO READ : एकत्र जाहिराती करण्यास रणबीर-आलियाचा नकार! वाचा, काय आहे खरे कारण!!

तूर्तास आलिया व रणबीर ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात बिझी आहेत. या चित्रपटाचे शूट सुरु झाले आणि दोघांच्याही रिलेशनशिपच्या बातम्या सुरू झाल्या. अर्थात या बातम्यांना आलिया व रणबीर दोघांनीही हवा दिली. अलीकडे दोघेही कधी नव्हे इतके एकत्र दिसू लागले आहे. सोनम कपूरच्या लग्नात एकत्र एन्ट्री करण्यापासून तर फॅमिलीसोबत एकत्र डिनर डेट करण्यापर्यंतचे दोघांचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
 एका मुलाखतीत रणबीर आपल्या रिलेशनशिपबद्दल बोलला होता.  ‘हे सध्या खूपच नवनवीन आहे. त्यामुळे मला यावर फारचे बोलायचे नाही. यास (नात्याला) आणखी काहीकाळ हवा आहे. काहीतरी स्पेस हवी आहे. एक कलाकार म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून आलिया खूपच चांगली आहे. जेव्हा मी तिचे काम बघतो, तिचा अभिनय बघतो किंवा तिच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल जाणून घेतो तेव्हा ती खूपच महत्त्वाकांक्षी असल्याचे मला दिसते. दोघांविषयी सांगायचे झाल्यास, आमच्यासाठी हे सर्व नवे आहे. त्यामुळे ते आणखी पुढे जायला हवे,’असे तो म्हणाला होता. 

Web Title: Ranbir Kapoor asked the question, 'Will you marry me?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.