रणबीर कपूर अन् अमिषा पटेलमध्ये काही गुफ्तगू तर सुरू नाही ना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2017 13:38 IST2017-03-30T08:08:44+5:302017-03-30T13:38:44+5:30
अभिनेता रणबीर कपूर याचा काका रणधीर कपूर यांच्या बर्थ-डे पार्टीत ‘कहो ना प्यार है गर्ल’ अमिषा पटेल हिच्यासोबत रणबीरने ...
रणबीर कपूर अन् अमिषा पटेलमध्ये काही गुफ्तगू तर सुरू नाही ना?
अ िनेता रणबीर कपूर याचा काका रणधीर कपूर यांच्या बर्थ-डे पार्टीत ‘कहो ना प्यार है गर्ल’ अमिषा पटेल हिच्यासोबत रणबीरने काढलेला एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. वास्तविक हा फोटो जुना असल्याने बहुतांश लोकांनी तो बघितला आहे. त्यामुळे याविषयी आता पुन्हा सांगायचे कारण काय? असा कदाचित तुमच्या मनात प्रश्न पडला असेल. परंतु हे सांगण्याचे खास कारण असे की, या फोटोनंतरच रणबीर आणि अमिषा यांच्यात खिचडी शिजत असल्याची जोरदार चर्चा आहे.
खरं तर रणधीर कपूरच्या बर्थ डे पार्टीत आलेल्या अमिषाला बघून प्रत्येकालाच झटका बसला होता. कारण अमिषा हिचा रणधीर कपूर किंवा त्यांच्या परिवाराशी दुरान्वये संबंध नाही. शिवाय ती करिना कपूरच्या गॅँगचीही सदस्य नाही. अशात अमिषाचे पार्टीत येण्याचे नेमके कारण काय हा प्रत्येकालाच पडलेला प्रश्न आहे. जेव्हा याविषयीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा अमिषा ही रणबीर कपूर याची खास असल्यानेच तिने पार्टीत हजेरी लावली होती.
![]()
पार्टीत उपस्थित असलेल्या सूत्रांनी सांगितले की, अमिषाने पार्टीत खूप एन्जॉय केला. रणबीर व्यतिरिक्त तिने रणधीर आणि करिनाबरोबरही फोटो काढलेत. एवढेच नव्हे तर अमिषाने सोशल मीडियावरही रणबीरसोबतचा एक फोटो शेअर केला. त्यामुळे या दोघांचा हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. शिवाय या फोटोमुळे दोघांमध्ये गुफ्तगु सुरू असल्याची चर्चाही रंगत आहे.
आता तर असेही बोलले जात आहे की, रणबीरने कॅटरिनानंतर अमिषाला जवळ केले आहे. आता यात कितपत तथ्यता आहे, हे त्या दोघानाच माहीत आहे. सध्या रणबीर संजय दत्तवर आधारित बायोपिकमध्ये काम करीत असून, अमिषा सनी देओलसोबत ‘भय्याजी सुपरहिट’ या चित्रपटात काम करीत आहे.