नर्गिस फाखरी व मॅट अलोंजोचे प्रेम बहरात! किस करतानाचा व्हिडिओ केला शेअर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 10:13 IST
अभिनेत्री नर्गिस फाखरी आणि अभिनेता उदय चोप्रा यांच्यात आता काहीही नाही, असे समजायला आता हरकत नाही. होय, नर्गिस व ...
नर्गिस फाखरी व मॅट अलोंजोचे प्रेम बहरात! किस करतानाचा व्हिडिओ केला शेअर!!
अभिनेत्री नर्गिस फाखरी आणि अभिनेता उदय चोप्रा यांच्यात आता काहीही नाही, असे समजायला आता हरकत नाही. होय, नर्गिस व उदयचे ब्रेकअप झाले आहे, या बातमीवर आता शिक्कामोर्तब करण्याची वेळ आली आहे. यामागचे कारण आहे, अमेरिकन दिग्दर्शक मॅट अलोंजो यांच्यासोबतचे नर्गिसची वाढती जवळीक. गेल्या काही दिवसांत नर्गिस व मॅट यांच्यात प्रेम फुलते आहे. काही दिवसांपूर्वी मॅटने नर्गिससोबतचा फोटो शेअर करत तो व नर्गिस रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहिर केले होते. यानंतरही दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत नर्गिस मॅटला किस करताना दिसली होती. आता नर्गिस व मॅटचा आणखी एक नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात नर्गिस व मॅट यांच्यातील अख्खी कहाणी स्पष्ट झाली आहे. या व्हिडिओत मॅट नर्गिसला किस करताना दिसतोय.व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा़ (साभार)हा व्हिडिओ शेअर करताना नर्गिस मॅटला ‘माझा मॅट...’, असे संबोधले आहे. माझा मॅट अलोंजो सेटवर काय करतो बघा, असे तिने हा लिहिले आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मॅटसोबतचे बरेच क्षण नर्गिसने शेअर केले आहेत. त्यावरूनही ती मॅटच्या प्रेमात किती आकंठ बुडालीय, हे स्पष्ट होतेय. तूर्तास मॅटसोबत नर्गिस जाम खूश असली तरी उदयच्या मनाची स्थिती आपण समजू शकतो. एकेकाळी याच नर्गिस व उदय चोप्राच्या रिलेशनशिपच्या बातम्या बॉलिवूडमध्ये चर्चिला जात होत्या.ALSO READ : नर्गिस फाखरीवरील प्रेम दाखविण्यासाठी ‘या’ दिग्दर्शकाने केला तिला अश्लिल स्पर्श!उदय चोप्रासोबत नर्गिस रिलेशनशिपमध्ये होती, असे मानले जाते. अर्थात नर्गिसने यास कधीही दुजोरा दिला नाही. गतवर्षी दोघांचे ब्रेकअप झाल्याची बातमी आली होती. यामुळे नर्गिस डिप्रेशनमध्ये गेल्याचेही कानावर आले होते. अर्थात नर्गिसने हे वृत्त नाकारले होते. शिवाय उदय व ती रिलेशनशिपमध्ये आहे, याचेही तिने खंडन केले होते. पण यानंतर सुमारे वर्षभरानंतर दोघेही एकत्र विमानतळावर दिसले होते. जगाच्या पाठीवर उदय चोप्रा इतका चांगला व्यक्ती मला भेटलेला नाही. उदय ज्याच्या कुणाच्या आयुष्यात असेल, ते त्याचे नशीब,असे मी म्हणेल. तो माझ्या आयुष्याचा भाग आहे आणि राहिल, असे नर्गिस एका मुलाखतीत म्हणाली होती.