‘वेलकम ३’मधून उदय शेट्टी गायब! नाना पाटेकर स्पष्टच बोलले, म्हणाले, “त्यांना वाटतं आम्ही...”

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 10:58 AM2023-09-13T10:58:25+5:302023-09-13T10:59:02+5:30

Welcome 3 : 'वेलकम ३' टीझरमधून मजनू भाई आणि उदय शेट्टी गायब असल्यामुळे प्रेक्षक नाराज होते. यावर आता उदय शेट्टीची भूमिका साकारलेल्या नाना पाटेकरांनी मौन सोडलं आहे.

nana patekar on not part of welcome 3 movie said they think we are old | ‘वेलकम ३’मधून उदय शेट्टी गायब! नाना पाटेकर स्पष्टच बोलले, म्हणाले, “त्यांना वाटतं आम्ही...”

‘वेलकम ३’मधून उदय शेट्टी गायब! नाना पाटेकर स्पष्टच बोलले, म्हणाले, “त्यांना वाटतं आम्ही...”

googlenewsNext

बहुचर्चित ‘वेलकम ३’ चा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या वेलकम चित्रपटाचा हा सीक्वल आहे. तब्बल सात वर्षांनी वेलकम चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे चाहते उत्सुक आहेत. पण, टीझरमधून मजनू भाई आणि उदय शेट्टी गायब असल्यामुळे प्रेक्षक नाराज होते. 'वेलकम ३'मध्ये मजनू भाई आणि उदय शेट्टी दिसणार की नाही याबाबत चाहते संभ्रमात होते. यावर आता उदय शेट्टीची भूमिका साकारलेल्या नाना पाटेकरांनी मौन सोडलं आहे.

विवेक अग्निहोत्रींच्या ‘द व्हॅक्सीन वॉर’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात नाना पाटेकर मुख्य भूमिका साकारत आहेत. या ट्रेलर लाँच सोहळ्यादरम्यान नाना पाटेकरांना वेलकम ३ बाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी स्पष्टच शब्दांत उत्तर दिलं. ते म्हणाले, “त्यांना वाटतं आता आम्ही जुने झालो आहोत. म्हणून कदाचित त्यांनी आम्हाला घेतलं नसेल.” नंतर विवेक अग्निहोत्रींकडे इशारा करत ते म्हणाले, “यांना वाटतं अजून आम्ही जुने झालेलो नाही, म्हणून त्यांनी आम्हाला घेतलं, सिंपल आहे.”

“इंडस्ट्री कधीच कोणासाठी बंद होत नाही. जर तुम्हाला चांगलं काम करण्याची इच्छा असेल तर लोक तुमच्याकडे येतात. ही माझी शेवटची संधी आहे, असा विचार करुनच तुम्ही त्या भूमिकेसाठी काम केलं पाहिजे. तर सगळ्यांना काम मिळतं. तुम्ही काम करण्यास इच्छुक आहात की नाही हे महत्त्वाचं आहे,” असंही ते पुढे म्हणाले.

दरम्यान, ‘वेलकम ३’मध्ये कलाकारांची तगडी फौज पाहायला मिळत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रवीना टंडन, सुनील शेट्टी, जॅकलीन फर्नांडिस, दिशा पटानी, लारा दत्ता, संजय दत्त, श्रेयस तळपदे हे कलाकार असणार आहेत.

Web Title: nana patekar on not part of welcome 3 movie said they think we are old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.