Join us

HOTNESS ALERT: वरुण धवनचे अल्ट्रा हॉट जिम बॉडी फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2017 11:59 IST

सोमवार आपल्या प्रत्येकासाठीच अतिशय कंटाळवाणा दिवस असतो. म्हणून मग आम्ही असा विचार केला की, आपला कंटाळा घालवून ‘दिल खुश’ करण्यासाठी वरुणचे हॉट अँड सेक्सी जिम फोटो पाहायलाच पाहिजे.

वरुण धवन म्हणजे ‘हॉटनेस’ आणि ‘क्युटनेस’चे परफेक्ट मिश्रण! सगळ्या मुलींचा फे व्हरेट आणि सगळ्या मुलांचा लाडका वरुण शर्ट आणि शर्टलेस अशा दोन्ही प्रकारे आकर्षक दिसतो. शर्ट घातलेला असेल तर क्युट आणि काढल्यावर अल्ट्रा हॉट दिसणारा वरुण केवळ ‘आय कँडी’ नाही. त्याची एक अशी गोष्ट आहे जी सर्व तरुणांना व्यायाम करून घाम गाळण्यास प्रेरित करते.ती गोष्ट म्हणजे वरुणचे ‘अति जिम प्रेम’. वरुण कितीही पार्टी-फन लव्हिंग असला तरी रोजच्या रोज जिममध्ये व्यायाम केल्याशिवाय राहत नाही. ‘फिटनेस फ्रीक’ वरुणच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर गेले असता तुम्हाला त्याचे अनेक ‘जिम पिक्स’ पाहायला मिळतील. तो अधुनमधून त्याच्या जिम सेशनचे फोटो चाहत्यांशी शेअर करीत असतो. पीळदार शरीर कमावलेला वरुण या फोटोंमध्ये किती हॉट दिसत असेल हे काही वेगळे सांगायला नको. आज आहे सोमवार. त्यामुळे शनिवार-रविवारचा विकेंड एन्जॉय केल्यानंतर पुन्हा एकदा आॅफिस किंवा कॉलेज सुरू झाले असेल. सोमवारचा दिवस आपल्या प्रत्येकासाठीच अतिशय कंटाळवाणा दिवस असतो. ‘ब्लडी मंडे’ असे उगीच नाही म्हणत. म्हणून मग आम्ही असा विचार केला की, आपला कंटाळा घालवून ‘दिल खुश’ करण्यासाठी वरुणचे हॉट अँड सेक्सी जिम फोटो पाहायलाच पाहिजे. त्यासाठीच त्याच्या इन्स्टाग्रामवरील काही फोटो येथे शेअर करीत आहोत. पाहा आणि उद्या सकाळी जिमला जाण्यासाठी प्रेरित व्हा. कारण व्यायाम केला तरच वरुणसारखी बॉडी कमवता येईल.वरुण धवन येत्या होळीला आलिया भट्टसोबत ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ चित्रपटात दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला.