‘अतिथी इन लंडन’च्या शूटिंगला लंडनमध्ये सुरूवात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2016 13:24 IST2016-12-30T13:11:11+5:302016-12-30T13:24:43+5:30

‘अतिथी इन लंडन’ या शीर्षकावरून परेश रावळ, अजय देवगन, कोंकणा सेन यांच्या मुख्य भूमिकेतील ‘अतिथी तुम कब जाओगे’ हा ...

'Guest in London' shoots start in London ... | ‘अतिथी इन लंडन’च्या शूटिंगला लंडनमध्ये सुरूवात...

‘अतिथी इन लंडन’च्या शूटिंगला लंडनमध्ये सुरूवात...

तिथी इन लंडन’ या शीर्षकावरून परेश रावळ, अजय देवगन, कोंकणा सेन यांच्या मुख्य भूमिकेतील ‘अतिथी तुम कब जाओगे’ हा कॉमेडी चित्रपट आठवतो ना? अजय-कोंकणा आणि त्यांच्या एका लहान मुलाच्या आयुष्यात जेव्हा एक अनाहुत पाहुणा येतो तेव्हा काय धम्माल, मजा अनुभवायला मिळते ते आपण ‘अतिथी तुम कब जाओगे’ मध्ये पाहिले. आता लवकरच या कॉमेडीला तडका देण्यासाठी चित्रपटाचा सिक्वेल ‘अतिथी इन लंडन’ येणार आहे. चित्रपटाची शूटिंग लंडनमध्ये नुकतीच सुरू झाली आहे. ‘प्यार का पंचनामा’ फेम कार्तिक आर्यन याने शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

                           
                           अभिनेता कार्तिक आर्यन याने शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.


 ‘अतिथी तुम कब जाओगे’ : कलाकार परेश रावळ, अजय देवगन, कोंकणा सेन.

‘अतिथी इन लंडन’ या सिक्वेलच्या कथानकात थोडासा बदल करण्यात आला आहे. कार्तिक आर्यन, परेश रावळ, कृती खरबांदा आणि तन्वी आझमी हे सिक्वेलमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. चित्रपटात कार्तिकची व्यक्तिरेखा हा त्याची गर्लफ्रेंडची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या  कृती खरबांदा हिच्यासोबत ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’ मध्ये राहत असतो. तेव्हा परेश रावळची व्यक्तीरेखा आणि त्याची पत्नी (तन्वी आझमी) अचानक घरी पाहुणे म्हणून येतात. त्यानंतर तुफान हास्याचे किस्से होतात. या चित्रपटाचे शूटिंग पुढील महिन्यापासून ५० दिवसांपर्यंत करण्यात येणार असून २०१७ मध्ये चित्रपट रिलीज होणार असल्याचे सुत्रांकडून कळतेय. डायना पेंटी या चित्रपटात असणार अशी चर्चा होती मात्र नंतर तिची व्यक्तीरेखा बाद करण्यात आली.
 

Web Title: 'Guest in London' shoots start in London ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.