'धुरंधर पार्ट २'ला टक्कर देणार ६०० कोटी बजेट असलेला सिनेमा, 'हा' अभिनेता प्रमुख भूमिकेत, पोस्टर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 16:13 IST2025-12-09T16:08:32+5:302025-12-09T16:13:42+5:30
'धुरंधर पार्ट २'शी स्पर्धा करण्यासाठी एक बिग बजेट सिनेमा सज्ज आहे, या सिनेमात भारतीय सिनेसृष्टी गाजवणारा एक प्रसिद्ध अभिनेता प्रमुख भूमिकेत आहे

'धुरंधर पार्ट २'ला टक्कर देणार ६०० कोटी बजेट असलेला सिनेमा, 'हा' अभिनेता प्रमुख भूमिकेत, पोस्टर रिलीज
सध्या रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमाची सर्वत्र चांगलीच चर्चा आहे. सत्य घटनांवर आधारीत हा सिनेमा प्रेक्षकांची हाऊसफुल गर्दी खेचण्यास यशस्वी झाला आहे. 'धुरंधर' सिनेमाचा पुढील भाग १९ मार्च २०२६ ला भेटीला येणार आहे. त्यामुळे दुसऱ्या भागात 'धुरंधर'ची कथा कशी वळण घेणार याची सर्वांना उत्सुकता आहे. पण अशातच 'धुरंधर पार्ट २' शी टक्कर घेण्यासाठी एक बिग बजेट सिनेमा त्याचवेळी रिलीज होणार आहे. जाणून घ्या.
'धुरंधर पार्ट २'शी स्पर्धा करणार हा सिनेमा
'धुरंधर पार्ट २' शी स्पर्धा करण्यासाठी केजीएफ स्टार यशचा 'टॉक्सिक' सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाचं पोस्टर आज आऊट झालं. १०० दिवस बाकी असलेलं हे पोस्टर चर्चेत आहे. ६०० कोटी बजेट असलेला 'टॉक्सिक' सिनेमा १९ मार्च २०२६ ला रिलीज होईल. या सिनेमात यशसोबत बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर झळकणार होती. परंतु काही कारणास्तव करीना कपूरने या सिनेमातून एक्झिट घेतली. आता तिच्या जागी अभिनेत्री नयनतारा यशच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे.
यश आणि गीतु मोहंदास यांनी लिहिलेला आणि गीतु मोहंदास यांनी दिग्दर्शित केलेला 'टॉक्सिक: अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स' हा मूळ सिनेमा कन्नडमध्ये आहे. कन्नडसोबत हा सिनेमा हिंदी, तेलुगु, तामिळ आणि मल्याळम भाषेत डब होणार होणार आहे. वेणकट के. नारायण यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमात यश आणि नयनतारासोबत आणखी कोण कलाकार दिसणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे आता 'धुरंधर पार्ट २' आणि 'टॉक्सिक' यापैकी कोणता सिनेमा बॉक्स ऑफिसवर बाजी मारणार, हे चित्र पुढील वर्षी १९ मार्चलाच स्पष्ट होईल.