Dhurandhar OTT: ओटीटीवर कधी येणार 'धुरंधर'? रणवीर सिंगच्या सिनेमाची इतक्या कोटींना झाली डील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 15:52 IST2025-12-09T15:51:37+5:302025-12-09T15:52:06+5:30

Dhurandhar OTT Released: 'धुरंधर' सिनेमा लवकरच ओटीटीवरही प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमाच्या ओटीटी रिलीजबाब मोठी अपडेट समोर आली आहे.

dhurandhar ott released ranveer singh movie to released on netflix | Dhurandhar OTT: ओटीटीवर कधी येणार 'धुरंधर'? रणवीर सिंगच्या सिनेमाची इतक्या कोटींना झाली डील

Dhurandhar OTT: ओटीटीवर कधी येणार 'धुरंधर'? रणवीर सिंगच्या सिनेमाची इतक्या कोटींना झाली डील

Dhurandhar OTT Released:रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जिकडे तिकडे धुरंधर' या अॅक्शन स्पाय थ्रिलर सिनेमाची चर्चा आहे. या सिनेमातून पाकिस्तानात जाऊन राहिलेल्या भारतीय गुप्तहेरांच्या गुप्त कारवायांची कहाणी दाखवण्यात आली आहे. 'धुरंधर'चे शो हाऊसफूल होत असून हा सिनेमा पाहण्यासाठी चाहते थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. 

'धुरंधर' सिनेमा लवकरच ओटीटीवरही प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमाच्या ओटीटी रिलीजबाब मोठी अपडेट समोर आली आहे. 'धुरंधर' सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे. 'धुरंधर' सिनेमा आणि त्याचा सीक्वल अशी मिळून एकूण १३० कोटींची डील करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारी महिन्यात 'धुरंधर' सिनेमा ओटीटीवर रिलीज होण्याची शक्यता आहे. 


रणवीर सिंग, आर माधवन, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन अशी 'धुरंधर' सिनेमाची स्टारकास्ट आहे. आदित्य धरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 'धुरंधर'ने चारच दिवसांत १०० कोटींचा गल्ला पार केला आहे. आत्तापर्यंत या सिनेमाने १२६.८८ कोटी कमावले आहेत. 

Web Title: dhurandhar ott released ranveer singh movie to released on netflix

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.