धनुष-क्रितीच्या 'तेरे इश्क में' सिनेमाच्या कमाईत सोमवारी मोठी घट, जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 11:57 IST2025-12-02T11:55:32+5:302025-12-02T11:57:07+5:30
गेल्या शुक्रवारी रिलीज झालेल्या सर्वच सिनेमांना बॉक्स ऑफिसवर संघर्ष करावा लागत आहे. जाणून घ्या सिनेमांची कमाई

धनुष-क्रितीच्या 'तेरे इश्क में' सिनेमाच्या कमाईत सोमवारी मोठी घट, जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन
बॉक्स ऑफिसवर सध्या विविध प्रकारच्या चित्रपटांची चलती आहे. धनुष आणि क्रिती सेनन यांची भूमिका असलेला 'तेरे इश्क में' या रोमँटिक चित्रपटाने चांगली कमाई केल्यानंतर रिलीज झाल्यानंतर पहिल्या सोमवारी मात्र चित्रपटाने किती कमाई केली? जाणून घ्या.
sacnilk च्या मते, 'तेरे इश्क में'ने रविवारी १९ कोटी रुपयांची कमाई केली होती, पण सोमवारी हा आकडा घसरून केवळ ८.२५ कोटी रुपयांवर आला. तरीही, पहिल्या चार दिवसांत या चित्रपटाने एकूण ६०.२५ कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.
दुसरीकडे, विजय वर्मा आणि फातिमा सना शेख यांचा 'गुस्ताख इश्क' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवसापासूनच कमाईच्या बाबतीत संघर्ष करत आहे. केवळ ५० लाख रुपयांच्या ओपनिंगनंतर, या चित्रपटाची सोमवारी कमाई अत्यंत निराशाजनक राहिली. 'गुस्ताख इश्क'ला सोमवारी केवळ ६ लाख रुपयेच कमवता आले, ज्यामुळे चार दिवसांत या चित्रपटाचे एकूण कलेक्शन केवळ १.३६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
या बॉलिवूड चित्रपटांच्या स्पर्धेत, अमेरिकन ॲनिमेटेड चित्रपट 'जूटोपिया २' चांगला टिकाव धरून आहे. 'गुस्ताख इश्क' पेक्षा सरस कामगिरी करत, 'जूटोपिया २' ने सोमवारी ६७ लाख रुपयांची कमाई केली, ज्यामुळे चार दिवसांतील त्याचा एकूण गल्ला ९.१२ कोटी रुपयांवर गेला आहे.
फरहान अख्तरचा देशभक्तीवर आधारित चित्रपट '१२० बहादूर' सध्या त्याच्या दुसऱ्या आठवड्यात आहे. प्रदर्शनाच्या ११ व्या दिवशी, म्हणजेच दुसऱ्या सोमवारी, या चित्रपटाने केवळ १६ लाख रुपये कमावले. यासह, '१२० बहादूर'चे आजपर्यंतचे एकूण कलेक्शन १७.०६ कोटी रुपये झाले आहे. एकूणच, वीकेंडच्या उत्साहानंतर सर्वच चित्रपटांच्या कमाईत सोमवारपासून घट झाली असल्याचं दिसत आहे.