डान्स झाला, आता नवाजुद्दीन सिद्दीकी गाणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2017 14:54 IST2017-03-30T09:24:14+5:302017-03-30T14:54:14+5:30
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयाला तोड नाही. ही बाब नवाजने सिद्ध करून दाखवली आहे. बॉलिवूडचे तिन्ही ‘खान’ सुद्धा मोठ्या मनाने ही ...

डान्स झाला, आता नवाजुद्दीन सिद्दीकी गाणार!
न ाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयाला तोड नाही. ही बाब नवाजने सिद्ध करून दाखवली आहे. बॉलिवूडचे तिन्ही ‘खान’ सुद्धा मोठ्या मनाने ही बाब मान्य करतात. पण कदाचित आता नवाजुद्दीन स्वत:तील आणखी एक नवे टॅलेंट जगापुढे आणू इच्छितो आहे. होय, डान्सिंगनंतर आता नवाज गाणे गातानाही दिसणार आहे. साबीर खान दिग्दर्शित ‘मुन्ना मायकल’मध्ये टायगर श्रॉफसोबत नवाजुद्दीन थिरकताना दिसणार, अशी बातमी आपण वाचली असेलच. या चित्रपटात नवाज एक डान्सर बनला आहे. पण आता यापेक्षाही मोठी खबर आहे. होय, कुशान नंदीच्या ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटात नवाजुद्दीन गाणे गाणार आहे. हे एक रॅप सॉन्ग आहे. नवाजुद्दीन लवकरच या गाण्याचे रेकॉर्डिंग करणार आहे.
ALSO READ : पाहा, ‘बाबूमोशाय बंदूकबाज’मधील नवाजुद्दीन सिद्दीकीचा अंदाज!
यानंतर या गाण्याच्या प्रमोशनल व्हिडिओमध्येही तो दिसेल. ‘हमारे बाप का बिटवा बंदूकबाज’ असे अश्मित कुंदरने लिहिलेल्या या गाण्याचे बोल आहेत. नवाजुद्दीन या रेकॉर्डिंगसाठी प्रचंड उत्सूक आहे, हे सांगणे नकोच. मला नवीन गोष्टी शिकायला, करायला मज्जा येते. मी कधीच लाईन्स विसरत नाही. त्यामुळे रॅप करताना काहीच अडचण नाही, असे नवाज म्हणाला.काल-परवा ‘बाबूमोशाय बंदूकबाज’चे पोस्टर रिलीज झाले. या पोस्टरमध्ये नवाज बनियान आणि लुंगी अशा भन्नाट अवतारात दिसतो आहे. त्याच्या डाव्या खांद्यावर एक ट्रांझिस्टर लटकवलेला आहे तर उजव्या हातात एक लहानशी बकेट आहे. पण या पोस्टरचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, नवाजने कमरेमागे बंदूक लपवलेली दिसतेय. एकंदर काय तर ‘बाबूमोशाय बंदूकबाज’मध्ये नवाजुद्दीनच्या अभिनयाची आणि एका नव्या अंगभूत सुप्त गुणांची आणखी एक झलक आपल्याला पाहायला मिळणार आहे.