दुलकर सलमान करणार बिजॉय नाम्बियारच्या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 21:59 IST2017-02-02T16:29:31+5:302017-02-02T21:59:31+5:30
दाक्षिणात्य सुपरस्टार दुलकर सलमान हा बिजॉय नाम्बियारच्या चित्रपटातून डेब्यू करणार असल्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. दक्षिणेतील रजनीकांत, कमल हसन ...

दुलकर सलमान करणार बिजॉय नाम्बियारच्या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू!
द क्षिणात्य सुपरस्टार दुलकर सलमान हा बिजॉय नाम्बियारच्या चित्रपटातून डेब्यू करणार असल्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. दक्षिणेतील रजनीकांत, कमल हसन व धनूष यांनी आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूड चित्रपट रसिकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. त्यांच्या भूमिका असलेल्या चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई देखील केली आहे. आता या रांगेत दुलकर सलमान यांची वर्णी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या दुलकर सलमान तामीळ-मल्याळम चित्रपट सोलोमध्ये भूमिका करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिजॉय नाम्बियार दुलकर सलमानच्या अभिनयाने प्रभावित झाले आहे. दुलकरचा अभिनय पाहून बिजॉय आपल्या आगामी बॉलिवूड चित्रपटात भूमिका देण्यास तयार झाले आहेत. नाम्बियार यांच्यानजीकच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिजॉय आपल्या बॉलिवूड चित्रपटात दुलकरला घेऊ इच्छितात. तो आपल्या आगामी चित्रपटाची कथा लिहीत असून यात दुलकर सलमानची मुख्य भूमिका असेल. मात्र याबद्दल सध्याच कोणतिही घोषणा करण्याची त्याला घाई नाही.
![]()
यावरून तरी असे दिसते की दुलकर सलमान बॉलिवूडमध्ये मोठा धमाका करू शकतो. केवळ दक्षिणेतच नव्हे तर उत्तर भारतातही दुलकर सलमानच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरू शकते. बिजॉय नाम्बियारने एका संकेत स्थळाला या बद्दल माहिती दिली. बिजॉय म्हणाला, मलाच नव्हे तर बॉलिवूड देखील दुलकर सलमानचा शोध घेतो आहे, मात्र सध्या मी जो चित्रपट करीत आहे त्यावर माझे लक्ष आहे. बिजॉयने दुलकर सलमानची गोष्ट टाळली असली तरी बॉलिवूडमध्ये कोणत्याही गोष्टी लपून राहत नाही याची त्याला चांगलीच माहिती आहे. दुलकर सलमानची एंट्री सलमान सारखी धमाकेदार होण्याची जबरदस्त शक्यता आहे.