या चित्रपटासाठी अदितीने बरीच मेहनत घेतलीय. खास या चित्रपटासाठी ती तामिळ शिकली. खरे तर या चित्रपटासाठी म्हणणे चुकीचे ठरेल. कारण अदिती तामिळ शिकली ती मणिरत्नम यांच्यासाठी. मणिरत्नम यांच्यासोबत काम करणे माझे स्वप्न होते. त्यांच्यासाठी मी कुठलीही भाषा शिकू शकते. त्यांनी मला जर्मन चित्रपटात काम करण्यासाठी विचारले तर मी क्षणही न घालवता, हो म्हणेल आणि जर्मन शिकेल सुद्धा, असे अदितीने सांगितले.ALSO READ : पद्मावतीमध्ये दिसणार अदिती‘कातरू वेलिदाई’ हा चित्रपट एक प्रेमकथा आहे. काल या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला. यातील लोकेशन्स तसेच आदिती व कार्थीचा रोमान्स पाहून तुम्हीही या चित्रपटाच्या प्रेमात पडाल. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या बर्फाच्छादित काश्मीरात या चित्रपटाचे शूटींग झाले आहे. याशिवाय उटी, हैदराबादेतही काही भागांचे चित्रीकरण झाले. या चित्रपटात अदिती एका डॉक्टरच्या भूमिकेत आहे. तर कार्थी वैमानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय श्रद्धा श्रीनाथ, आर.जे. बालाजी. दिल्ली गणेश यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ए.आर. रहमानने या चित्रपटाला संगीत दिले आहे. तेव्हा तुम्हीही पाहा, आदिती- कार्थीचा आॅनस्क्रीन रोमान्स.... या जोडीच्या प्रेमात पडल्याशिवाय तुम्हीही स्वत:ला रोखू शकणार नाही, हेच खरे!!It is official #ManiRatnam's #KaatruVeliyidai on April 7. Via @ThenandalFilms in TN. pic.twitter.com/PFGu0ZrdXu— Sreedhar Pillai (@sri50) 27 January 2017
Confirmed! ‘या’ तारखेला होणार अदिती राव हैदरीची ‘स्वप्नपूर्ती’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 16:52 IST
अदिती राव हैदरीचे स्वप्न पूर्ण झालेय. होय, मणिरत्नम यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी अदितीला मिळालीय. मणिरत्नम यांच्या ‘कातरू वेलिदाई’ या तामिळ चित्रपटात अदिती दिसणार आहे. आमच्याकडे अदितीच्या या स्वप्नपूर्तीबाबत आणखी एक आनंदाची बातमी आहे. अदिती आणि कार्थीची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट येत्या ७ एप्रिलला रिलीज होणार आहे.