प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना अटक, ३० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 18:07 IST2025-12-07T18:03:04+5:302025-12-07T18:07:57+5:30
प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना अटक, नेमकं प्रकरण काय?

प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना अटक, ३० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
Vikram Bhatt: प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक निर्माते विक्रम भट्ट यांच्याबाबतीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अलिकडेच त्यांच्याविरोधात ३० कोटीं रुपयांच्या फसवणुकी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी विक्रम भट्ट यांच्यासह पत्नी श्वेतांबरी आणि इतर सहा जणांची नावे समोर आली होती. आता या प्रकरणाला एक वेगळंच वळण आलं आहे. दिग्दर्शक,निर्माते विक्रम भट्ट यांना राजस्थान आणि मुंबई पोलिसांनी एकत्र कारवाई करत यारी रोड येथून अटक केली आहे.
राजस्थानमधील भूपालपुरा पोलीस स्टेशनमध्ये प्रसिद्ध डॉक्टर आणि इंदिरा आयव्हीएफचे संस्थापक डॉ. अजय मुरडिया यांनी ही तक्रार दाखल केली असून भट्ट यांनी त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे.मुरडिया यांच्या दिवंगत पत्नी यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल बायोपिक बनवण्यासाठी त्यांनी भट्ट यांनी राजी केलं. परंतु, पैसे घेऊनही चित्रपट बनवण्यात आला नाही, अशी तक्रार मुरडिया यांनी दाखल केली आहे. दिग्दर्शकासह अन्य ८ जणांची नावे या प्रकरणाशी जोडली गेली आहेत. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती आले आहेत.आता राजस्थान पोलीस त्यांना आपल्यासोबत उदयपूरला घेऊन जाण्यासाठी वांद्रे न्यायालयात ट्रान्झिट रिमांडसाठी अर्ज करणार आहे.
दरम्यान, सात दिवसांपूर्वी उदयपूर पोलिसांनी विक्रम भट्ट, त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट आणि इतर सहा आरोपींविरुद्ध लूकआउट नोटीस जारी केली होती. शिवाय सर्व आरोपींना 8 डिसेंबरपर्यंत उदयपूर पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी नोटीस देण्यात आली होती. यावर प्रतिक्रिया देत विक्रम भट्ट ते कागदपत्र बनावट असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.
नेमकं प्रकरण काय?
एका कार्यक्रमात दिनेश कटारिया आणि विक्रम भट्ट यांची भेट झाली होती. यादरम्यान, दिनेश यांना त्यांच्या पत्नीच्या जीवनकार्यावर बायोपिक बनवण्याची ऑफर दिली होती.या प्रोजेक्टमधून कोट्यवधींचा नफा होईल असे आश्वासन देऊन डॉ. मुरडिया यांना ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवण्यात आल्याचं एफआयआरमध्ये नमुद करण्यात आलं आहे. या प्रकरणी विक्रम भट्ट यांना ताब्यात घेतल्यानंतर इंडस्ट्रीत मोठी खळबळ माजली आहे.