'सैयारा'ने बदलली अहान पांडेच्या यशाची गणितं! चित्रपटाच्या रिलीजपूर्वी अभिनेत्याला आलेलं 'या' गोष्टीचं टेन्शन, बहीण अनन्या म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 13:39 IST2025-12-02T13:29:04+5:302025-12-02T13:39:53+5:30
'सैयारा' च्या प्रदर्शनापूर्वी अहानला सतावत होती 'या' गोष्टीची चिंता; अनन्या पांडेचा खुलासा, म्हणाली...

'सैयारा'ने बदलली अहान पांडेच्या यशाची गणितं! चित्रपटाच्या रिलीजपूर्वी अभिनेत्याला आलेलं 'या' गोष्टीचं टेन्शन, बहीण अनन्या म्हणाली...
Ananya Panday On Saiyaraa: गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूडमधील काही मोजकेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. विकी कौशलचा छावा हा चित्रपट त्यापैकी एक आहे. त्यानंतर मोहित सुरी दिग्दर्शित सैयारा सिनेमाने बॉक्स ऑफिस अक्षरश दणाणून सोडलं. हा चित्रपट १८ जुलैला संपूर्ण देशभरात प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमाने इंडस्ट्रीला दोन नवे उभरते कलाकार दिले.सैयारामधील अहान पांडे आणि अनित पड्डाच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. करिअरमधील पहिल्याच चित्रपटाने त्यांना रातोरात स्टार बनवलं. परंतु, सैयाराच्या प्रदर्शनापूर्वी अभिनेता अहान पांडे प्रचंड टेन्शनमध्ये आला होता.नुकत्याच एका मुलाखतीत त्याची चुलत बहिण अभिनेत्री अनन्या पांडेने याबाबत खुलासा केला आहे.
अलिकडेच अनन्या पांडेने एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली. दरम्यान, तिने सैयाराच्या यशाबद्दल भाष्य केलं. तेव्हा ती म्हणाली,"आजकाल थिएटरमध्ये कोणता चित्रपट चालेल याची शाश्वती नाही... यावर अभिनेत्रीला तिचं मत विचारण्यात आलं. हो, आजकाल कोणता सिनेमा चालेल, याबाबत अंदाज लावणं खरंच अशक्य आहे.माझा भाऊ अहानचा सैयारा चित्रपट हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. कोणालाही या चित्रपट रिलीज होणार असल्याचं माहित नव्हतं. शिवाय अहान आणि अनीतला कोणीही फारसं ओळखत नव्हतं."
मग पुढे अनन्या म्हणाली, "मला आठवतंय सैयाराच्या रिलीजपूर्वी २-३ दिवस आधी माझं अहानसोबत फोनवर बोलणं झालं होतं. तो मला एवढंच म्हणत होती की, माहित नाही पुढे काय होणार आहे. मला आशा आहे लोक माझा सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये जातील. सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजेच पहिल्याच दिवशी त्याच्या चित्रपटाने २२ कोटींची कमाई केली. हा अनेकांसाठी सुखद धक्का होता. सैयाराने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. त्यामुळे तु्म्ही कधी काय चालेल याचा अंदाज नाही लावू शकत. पण, माझ्यासाठी यश म्हणजे एक चांगली अभिनेत्री म्हणून ओळखलं जाणं. "अशा भावना अभिनेत्रीने मुलाखतीत व्यक्त केल्या.