प्रेम चोप्रा झालेले 'या' गंभीर आजाराचे शिकार, आता कशी आहे तब्येत? जावई म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 16:42 IST2025-12-09T16:21:44+5:302025-12-09T16:42:54+5:30

अलिकडेच महिनाभरापूर्वी प्रेम चोप्रा यांना प्रकृती बिघडल्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

bollywood actor sharman joshi give health update of father in law prem chopra share post | प्रेम चोप्रा झालेले 'या' गंभीर आजाराचे शिकार, आता कशी आहे तब्येत? जावई म्हणाला...

प्रेम चोप्रा झालेले 'या' गंभीर आजाराचे शिकार, आता कशी आहे तब्येत? जावई म्हणाला...

Sharman Joshi Gives health update of prem chopra: आपल्या खलनायिकी भूमिकांना रुपेरी पडदा गाजवणारे अभिनेते म्हणजे प्रेम चोप्रा. चेहऱ्यावर विकृत हास्य आणि अधूनमधून डोळे वटारूण पाहण्याची सवय ,जिभेवर लालसा असणारा चित्रपटातील त्यांनी साकारलेला खलनायक आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे. त्यांनी आपल्या अभिनय कारकि‍र्दीत ३८० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं.  वयाच्या नव्वदीतही ते इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. मात्र, अलिकडेच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.त्यानंतर प्रेम यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती कळताच त्यांचे चाहते देखील प्रचंड चिंतेत होते. मात्र, त्यावेळी प्रेम चोप्रा यांना नेमकं काय झालं होतं? याबद्दल जावयाने अपडेट दिली आहे. 


अभिनेते प्रेम चोप्रा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आलं आहे. अभिनेता शर्मन जोशी हा प्रेम चोप्रा यांचा जावई आहे. सासऱ्यांच्या या आजारपणात तो त्यांच्या सावलीसारखा  सोबत राहिला. नुकतीच शर्मन जोशीने सोशल मीडियावर प्रेम यांच्या प्रकृतीबाबत हेल्थ अपडेट दिली आहे. शिवाय त्यांच्यावर ज्या रुग्णालयात उपचार सुरु होते. तेथील डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. या पोस्टद्वारे शर्मनने सांगितलं की प्रेम चोप्रा यांना गंभीर (transcatheter Arotic Valve Implantation) महाधमनी स्टेनोसिसचं  निदान झालं होतं. विशेष म्हणजे ओपन हॉर्ट सर्जरीशिवाय त्यांच्यावर उपचार करण्यात आले. 

सध्या प्रेम चोप्रा यांच्या तब्येतीत खूप सुधारणा आहे.अभिनेता शर्मन जोशीने या सोशल मीडियावर सासरेबुवा प्रेम चोप्रा यांचे काही फोटो शेअर केले आहेत. तसेच जितेंद्र आणि त्यांचा रुग्णालयातील भेटीचा एक सुंदर फोटो देखील पोस्ट केलाय.अभिनेत्याने या पोस्टमध्ये लिहिलंय, “आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीने, मला हृदयरोग तज्ज्ञ डॉ. नितीन गोखले आणि इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. रविंदर सिंग राव यांचे आभार मानायचे आहेत. त्यांनी माझ्या सासऱ्यांवर चांगले उपचार केले. त्यासाठी मी त्यांचा कायम कृतज्ञ राहिन.

प्रेम चोप्रा यांच्या आजारपणाबद्दल सांगताना शर्मनने म्हटलंय, "त्यांना गंभीर एओर्टिक स्टेनोसिसचं निदान झालं होतं. यावर उपचार करत डॉ. राव यांनी ओपन-हार्ट सर्जरीशिवाय TAVI प्रोसिजर यशस्वीरीत्या पार पाडली. डॉ. गोखले यांनी प्रत्येक टप्प्यावर केलेल्या मार्गदर्शनामुळे आम्हाला प्रचंड आत्मविश्वास मिळाला. ते आता सुखरुप घरी परतले आहेत. तुमचं प्रेम आणि काळीसाठी आभारी आहोत...", अशा आशयाची पोस्ट अभिनेत्याने लिहिली आहे. 

Web Title: bollywood actor sharman joshi give health update of father in law prem chopra share post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.