तमन्ना भाटियासोबतच्या ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान विजय वर्माची प्रतिक्रिया, म्हणाला-"गेल्या काही काळात…"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 17:14 IST2025-12-09T17:12:34+5:302025-12-09T17:14:59+5:30
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा हे दोघंही एकमेकांना डेट करत होते. मात्र, काही कारणांमुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला.

तमन्ना भाटियासोबतच्या ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान विजय वर्माची प्रतिक्रिया, म्हणाला-"गेल्या काही काळात…"
Vijay Varma: हिंदी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी प्रचंड मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीत स्वत: चं एक वेगळं स्थान निर्माण केलं.असाच एक अभिनेता म्हणजे विजय वर्मा. विजय हा त्याच्या विविध धाटणीच्या भूमिकांसाठी ओळखला जातो. अलिकडेच तो 'गुस्ताख इश्क' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, बरेच महिने विजय रुपेरी पडद्यापासून दूर होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने यामागचं कारण सांगितलं आहे.
अलिकडेच 'हिंदुस्तान टाईम्स'सोबत संवाद साधताना विजय म्हणाला,"गेल्या काही काळात माझ्याकडे काही नव्हतं. त्यामुळे काही वेगळ्या मुद्द्यावर लोकांना चर्चा करायला सुरुवात केली. मला शांतता खूप आवडते, पण आपल्या या क्षेत्रात ते शक्य नाही. मी 'द कांंधार हायजॅक'नंतर माध्यमांसोबत संवाद साधला नाही. तसंच मी एकही मुलाखत दिली नाही, तरी सुद्धा माझ्याबद्दल चर्चा होत होत्या आणि हे माझ्याही नियंत्रणाबाहेर होतं.त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होतो. त्यामुळे मला या सगळ्यापासून शांतता हवी होती. पण त्यावर माझं काही नियंत्रण नव्हतं."
तमन्ना भाटियासोबत रिलेशनशिपवर विजय काय म्हणाला?
यादरम्यान, विजय म्हणाला, "माझ्या मते आपण नातं जेव्हा सार्वजनिक असतं तेव्हा आपल्याबद्दल कायम चर्चा होते. त्यामुळे लोक मला एका ठराविक पद्धतीने पाहत होते." असं वक्तव्य विजय वर्माने केलं.तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा हे दोघंही एकमेकांना डेट करत होते.अनेकदा त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. मात्र, काही कारणांमुळे त्यांचं ब्रेकअप झालं.
वर्कफ्रंट
'गल्लीबॉय', 'डार्लिंग', 'जानेजान', 'दहाड़' यांसारखे सिनेमे तसेच वेबसिरीजमधून काम करत अभिनेता विजय वर्मा प्रकाशझोतात आला. मनोरंजन विश्वात चाहत्यांच्या मनावर त्याने आपल्या अभिनयाची छाप उमटवली. दमदार अभिनयाच्या जोरावर विजय वर्मा आजही प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण इथपर्यंतचा त्याचा प्रवास फार काही सोपा नव्हता.