अर्जुनचे सलमान स्टाईल टपोरी ‘तेवर’

By Admin | Updated: December 5, 2014 08:56 IST2014-12-04T22:54:25+5:302014-12-05T08:56:46+5:30

बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर लवकरच रिलीज होणाऱ्या ‘तेवर’ या चित्रपटात सलमान खानचा फॅन बनला आहे.

Arjun's Salman style 'Tevar' | अर्जुनचे सलमान स्टाईल टपोरी ‘तेवर’

अर्जुनचे सलमान स्टाईल टपोरी ‘तेवर’

बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर लवकरच रिलीज होणाऱ्या ‘तेवर’ या चित्रपटात सलमान खानचा फॅन बनला आहे. ‘मै तो सुपरमॅन’ या गाण्यात तर तो स्वत:ला सलमानचा फॅन म्हणवून घेताना दिसतो. ‘इश्कजादे’नंतर अर्जुनने दुसऱ्यांदा सलमानची स्टाईल दाखवली आहे. खऱ्या आयुष्यातही अर्जुन सलमानचा जबरदस्त फॅन आहे. त्यामुळे तो त्याच्यासारखी अ‍ॅक्शन आणि अभिनय करण्याचा प्रयत्न करत असतो. अर्जुन शाहरुखचाही फॅन आहे; पण सलमान आणि शाहरुखच्या अभिनयाची तुलना करणे मूर्खपणाचे आहे, असे त्याला वाटते. त्याच्या मते दोघेही त्यांच्या भूमिकांपेक्षाही लोकप्रिय आहेत. त्यांना चित्रपटांमुळे नव्हे, तर त्यांच्या चार्ममुळे पसंत केले जाते.

Web Title: Arjun's Salman style 'Tevar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.