'बिग बॉस १९'नंतर फरहाना भटला लागली लॉटरी, मिळाली या रिअॅलिटी शोची ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 18:32 IST2025-12-08T18:31:36+5:302025-12-08T18:32:00+5:30
'बिग बॉस १९' (Bigg Boss 19) चा अंतिम सोहळा नुकताच पार पडला. या सीझनचा विजेता गौरव खन्ना ठरला. तर, फरहाना भट (Farhana Bhatt) या सीझनची पहिली रनर-अप ठरली. याचदरम्यान, अभिनेत्रीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

'बिग बॉस १९'नंतर फरहाना भटला लागली लॉटरी, मिळाली या रिअॅलिटी शोची ऑफर
सलमान खानचा रिअॅलिटी शो 'बिग बॉस १९'चा अंतिम सोहळा नुकताच पार पडला आणि शोला त्याचा विजेताही मिळाला. आता सगळ्यांचे लक्ष 'बिग बॉस'नंतर सुरू होणाऱ्या 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi) या रिअॅलिटी शोवर लागले आहे. लवकरच रोहित शेट्टी एका नव्या सीझनसह 'खतरों के खिलाडी' घेऊन छोट्या पडद्यावर परतणार आहे. इतकेच नव्हे तर, रोहित शेट्टीने 'बिग बॉस'च्या मंचावर येऊन आपल्या या शोची घोषणा केली. आता निर्माते हळूहळू या शोसाठी स्पर्धकांना विचारणा करत आहेत. दरवर्षी 'खतरों के खिलाडी'चे निर्माते 'बिग बॉस'मधील स्पर्धकांना शोसाठी संपर्क साधतात. यावर्षी निर्मात्यांचे लक्ष फरहाना भटकडे वळले आहे.
फरहानाला शोमध्ये आणण्यासाठी निर्मात्यांचे प्रयत्न सुरू आहेत. फरहानाने 'बिग बॉस १९'मध्ये असताना आपल्या भविष्यातील योजनांचाही खुलासा केला होता. तिने सांगितले होते की, ती 'बिग बॉस'नंतर 'खतरों के खिलाडी १५'मध्ये जाणार आहे, ज्यामुळे चाहत्यांना तिच्या शोमधील एंट्रीचा संकेत मिळाला. अलीकडेच फरहाना भटने इंडिया फोरमला मुलाखत दिली, ज्यात तिने 'खतरों के खिलाडी'बद्दल स्पष्टपणे सांगितले. ती म्हणाली की, "मला पुढील रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी १५' करायचा आहे." अभिनेत्रीने सांगितले की, तिला रोहित शेट्टीच्या शोची ऑफर देखील मिळाली आहे आणि तिला या शोचा भाग व्हायला नक्कीच आवडेल.
'खतरों के खिलाडी' हा शो फरहानाच्या रिअॅलिटी शोच्या प्रवासात खूप महत्त्वाचा ठरेल. फरहाना भट 'बिग बॉस १९'ची पहिली रनर-अप ठरली होती. 'बिग बॉस'मुळे फरहानाच्या फॅन फॉलोइंगमध्ये लक्षणीय वाढ झाली. फरहानाला चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांचाच जबरदस्त पाठिंबा मिळाला होता. फरहानाला पाठिंबा देणाऱ्यांच्या यादीत दीपिका कक्कर, रिद्धी डोगरा, कुनिका सदानंद, माहिरा खानसह अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. फरहानाने छोट्या पडद्यावर नव्हे, तर चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटात पाहिले गेले होते.