'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 23:03 IST2025-12-07T23:03:13+5:302025-12-07T23:03:40+5:30
बिग बॉस १९ मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला आहे. तान्या चौथ्या नंबरवर एलिमिनेट झाली आहे. सर्वांचं लक्ष प्रणित मोरेवर आहे

'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
'बिग बॉस १९' शोचा ग्रँड फिनाले सुरु आहे. या फिनालेमधून पहिल्यांदा अमाल मलिक घराबाहेर पडला. त्यानंतर नुकतंच 'बिग बॉस १९'मधून अभिनेत्री तान्या मित्तल घराबाहेर पडली आहे. तान्याचा 'बिग बॉस १९'मधील प्रवास संपला आहे. तान्याने तिच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं आहे. परंतु तान्याचं ट्रॉफीवर नाव कोरण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं.
तान्या मित्तलचा प्रवास संपला
तान्या सुरुवातीपासून तिचे अजब किस्से आणि तिच्या स्वभावामुळे घरात चर्चेत होती. इतकंच नव्हे घराबाहेरही तान्या मित्तलचे किस्से चांगले गाजले. तान्याची घरात अनेक लोकांसोबत भांडणं झाली. सलमान खानने मात्र वीकेंड का वारमध्ये तान्याची चांगलीच शाळा घेतली. याशिवाय तान्याने सांगितलेल्या मोठमोठ्या कहाण्यांची खिल्ली उडवली. अखेर तान्याचा 'बिग बॉस १९'चा प्रवास संपला. टॉप ४ स्पर्धक बनून तान्या मित्तल घराबाहेर पडली आहे.
प्रणित मोरे बिग बॉस १९ च्या टॉप ३ मध्ये
तान्या मित्तल आणि अमाल मलिक घराबाहेर पडल्याने आता प्रणित मोरे, गौरव खन्ना आणि फरहाना भट टॉप ३ मध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे टॉप ३ मधून प्रणित मोरे 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर नाव कोरणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. आता पुढच्या काही वेळात प्रणित, फरहाना आणि गौरवपैकी कोण बाहेर पडणार हे स्पष्ट होईल. सलमान खान पुन्हा एकदा त्याच्या खास सूत्रसंचालनाच्या शैलीने 'बिग बॉस १९' गाजवत आहे.