राजू, रँचो अन् फरहानचं त्रिकूट पुन्हा एकत्र येणार? '३ इडियट्स' च्या सीक्वलबाबत मोठी अपडेट समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 10:00 IST2025-12-09T09:55:21+5:302025-12-09T10:00:27+5:30

3 Idiots Part 2: २००९ साली आलेला '३ इडियट्स' हा सिनेमा आजही सिनेरसिक तितकाच आवडीने पाहतात.मागील बऱ्याच काळापासून प्रेक्षक  या कल्ट क्लासिक चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याची मागणी करत आहेत. याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

aamir khan r madhavan and sharman joshi reuniting for 3 idiots movie sequel script locked says report | राजू, रँचो अन् फरहानचं त्रिकूट पुन्हा एकत्र येणार? '३ इडियट्स' च्या सीक्वलबाबत मोठी अपडेट समोर

राजू, रँचो अन् फरहानचं त्रिकूट पुन्हा एकत्र येणार? '३ इडियट्स' च्या सीक्वलबाबत मोठी अपडेट समोर

3 Idiots Movie Sequal:आमिर खान, आर.माधवन, शर्मन जोशी आणि करीना कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या  '३ इडियट्स' या सिनेमाची लोकप्रियता आजही कायम आहे. २००९ मध्ये प्रदर्शित झालेला '३ इडियट्स' हा चित्रपट केवळ बंपर हिट ठरला नाहीतर त्याने बॉक्स ऑफिस अक्षरश दणाणून सोडलं. दमदार कथानक आणि त्यातील प्रत्येक सीन, डायलॉग्ज लोकांना खूप आवडले. या चित्रपटातील सगळी पात्र म्हणजेच अगदी राजू, रॅंचो आणि फरहान हे त्रिकूट प्रत्येकाच्या स्मरणात आहे. काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा लवकरच सीक्वल येण्याची शक्यता आहे. 

राजू, रँचो आणि फरहान हे त्रिकूट पुन्हा येतंय भेटीला...

'३ इडियट्स' हा चित्रपट २००९ साली प्रदर्शित झाला होता.त्यानंतर याचा सीक्वल कधी येणार याबद्दल जाणून घेण्यास चाहते प्रचंड उत्सुक होते. अखेर बऱ्याच प्रतीक्षेनंतर या चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती मिळते आहे. 

मिडिया रिपोर्टनुसार, '३ इडियट्स'च्या दुसऱ्या भागात आमिर खान, करीना कपूर, आर.माधवन आणि शर्मन जोशी मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र दिसणार आहेत. राजकुमार हिरानी यांच्या खांद्यालवर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा आहे. तर विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि आमिर तिघे मिळून याची निर्मिती करणार आहे. जवळपास १५ वर्षानंतर या सीक्वल बनणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाचं स्क्रिप्ट पूर्ण झालं असून शूटिंग येत्या २०१६ पासून सुरु करण्यात येणार असल्याचंही म्हटलं जात आहे. 

Web Title : '3 इडियट्स' का सीक्वल: आमिर खान, माधवन, जोशी 15 साल बाद फिर साथ?

Web Summary : खबर है कि '3 इडियट्स' का सीक्वल बन रहा है, जिसमें आमिर खान, आर. माधवन, शरमन जोशी और करीना कपूर फिर से साथ दिखेंगे। राजकुमार हिरानी द्वारा निर्देशित और विधु विनोद चोपड़ा और आमिर खान द्वारा निर्मित, फिल्म की शूटिंग जल्द ही शुरू होने की अफवाह है, जिससे प्रशंसकों में उत्साह है।

Web Title : '3 Idiots' Sequel: Aamir Khan, Madhavan, Joshi Reunite After 15 Years?

Web Summary : The '3 Idiots' sequel is reportedly in the works, reuniting Aamir Khan, R. Madhavan, Sharman Joshi, and Kareena Kapoor. Directed by Rajkumar Hirani and produced by Vidhu Vinod Chopra and Aamir Khan, filming is rumored to begin soon, creating excitement among fans.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.