You can buy renault kwid car in the price of kiara advanis luxurious waist bag | कियारा अडवाणीच्या छोट्याशा बॅगची किंमत वाचून व्हाल अवाक्
कियारा अडवाणीच्या छोट्याशा बॅगची किंमत वाचून व्हाल अवाक्

आपल्यापैकी सर्वांनाच माहित आहे की, बॉलिवूडसेलिब्रिटी आणि खासकरून अभिनेत्री लग्जरी ब्रँडच्या शौकीन असतात. तसेच त्या अनेकदा ब्रँडेड आणि महागड्या कपड्यांसोबत एकपेक्षा एक अशा महागड्या एक्ससरीजही  कॅरी करताना दिसून येतात. या लिस्टमध्ये हॅन्डबॅग्सचा नंबर सर्वात पहिला असतो. करिना कपूरपासून सोनम कपूरपर्यंत आणि अलिया भट्टपासून दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा यांसारख्या बॉलिवूडमधील अग्रगण्य अभिनेत्री महागड्या आणि ब्रँन्डेड हॅन्डबॅग्स कॅरी करताना दिसून येतात. या लिस्टमध्ये आता आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडण्यात आलं आहे. कबीक सिंग फेम अभिनेत्री कियारा अडवाणीही या अभिनेत्रींच्या बरोबरीने अनेक ब्रँडेड आणि महागड्या अक्सेसरीज फ्लॉन्ट करताना दिसून येते. 

बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातलेल्या कबीर सिंग या चित्रपटानंतर कियारा अडवाणी भलतीच चर्चेत आली आहे. पण सध्या कियारा चित्रपट नाहीतर वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. सध्या कियारा आपले ब्रँडेड आउटफिट्स आणि अक्सेसरीजमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी कियारा अडवाणीने आपला 27वा बर्थ डे साजरा केला. आपल्या बर्थडे पार्टिसाठी कियाराने व्हाइट कलरची सॅटिन फॅब्रिक असेलेली फिश कट प्लेन स्कर्ट आणि ब्रालेस स्टाइल व्हाइट क्रॉप टॉप वेअर केला होता. त्याचबरोबर तिने अक्ससेरिज म्हणून एक वेस्ट बॅग कॅरी केली होती. परंतु, या वेस्ट बॅगला वेगळा लूक देण्यासाठी कियाराने वेस्टवर बांधण्याऐवजी गळ्यामध्ये घातली होती. 

खरं तर कियारा चर्चेत आली ती, आपल्या या छोट्याशा बॅगमुळे. दिसायला छोटी असली तरी ती काही साधारण बॅग नव्हती. कियाराने लग्जूरियस ब्रँड असलेल्या Chanel ची व्हाइट कलरची क्रॉस बॉडी वेस्ट बॅग कॅरी केली होती. आता तुम्ही म्हणाल यात काय खास आहे? अहो खास म्हणजे, या बॅगेची किंमत 5 हजार डॉलर म्हणजे जवळपास 3 लाख 50 हजार रूपये इतकी आहे. 

दरम्यान, लॅम्ब स्किन गोल्ड टोन आणि सिल्वर टोन मेटलपासून तयार करण्यात आलेली कियाराच्या या बॅगेच्या किमतीमध्ये एक रेनो क्विड कार नक्कीच खरेदी केली जाऊ शकते. एवढचं नाहीतर तुम्ही एखादी फॉरेन टूरही करू शकता. 


Web Title: You can buy renault kwid car in the price of kiara advanis luxurious waist bag
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.