उन्हाळ्याच्या सीझनमध्ये शॉपिंगसाठी फायदेशीर ठरतील 'या' टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 04:55 PM2019-03-22T16:55:01+5:302019-03-22T16:59:36+5:30

सध्या वातावरण बदलत असून हळूहळू उन्हाळ्याची चाहूल लागत आहे. थंडी नाहीशी झाली असून थंडीचे कपडे आता व्यवस्थित पॅक करून ठेवून देण्याची वेळ आहे. अशातच आता तुमच्या वॉर्डरोबमध्ये खास उन्हाळ्यासाठी आउटफिट्स दिसणं गरजेचं आहे.

Useful tips for summer shopping | उन्हाळ्याच्या सीझनमध्ये शॉपिंगसाठी फायदेशीर ठरतील 'या' टिप्स!

उन्हाळ्याच्या सीझनमध्ये शॉपिंगसाठी फायदेशीर ठरतील 'या' टिप्स!

Next

(Image Credit : Finance Blvd)

सध्या वातावरण बदलत असून हळूहळू उन्हाळ्याची चाहूल लागत आहे. थंडी नाहीशी झाली असून थंडीचे कपडे आता व्यवस्थित पॅक करून ठेवून देण्याची वेळ आहे. अशातच आता तुमच्या वॉर्डरोबमध्ये खास उन्हाळ्यासाठी आउटफिट्स दिसणं गरजेचं आहे. बाजारातही आता समर सीझन स्पेशल आउटफिट्स आणि फुटवेअर्स दिसून येत आहेत. अशातच आता उन्हाळ्यासाठी शॉपिंग करण्याचा विचारात असाल तर काही खास टिप्स लक्षात घेणं आवश्यक आहे. 

कपड्यांचं फॅब्रिक

आजकाल जास्तीतजास्त कपड्यांमध्ये पॉलिस्टर असतं. पॉलिस्टरमध्ये हवा अजिबात एन्टर होत नाही. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये घाम आल्यानंतर कपड्यांवर वेगळेच स्पॉट दिसू लागतात. अशा आउटफिट्सना प्राधान्य द्या जे त्वचा कूल ठेवण्यासोबतच घाम रोखण्यासाठीही मदत करतात. 

फुटवेअर

थंडीमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये फुटवेअर सिलेक्ट करण्याची पद्धत वेगवेगळी असते. उन्हाळ्यामध्ये असे फुटवेअर्स सिलेक्ट करा जे तुमच्या फुट साइजपेक्षा थोडे मोठे असतील. कारण उन्हाळ्यामध्ये आपल्या पायांना सूज येते. ज्यामुळे फिट होणारे शूज वेअर करताना त्रास होतो. 

टाइट कपड्यांपासून दूर रहा 

उन्हाळ्यामध्ये टाइट कपड्यांपासून दूर रहा. घाम आणि गरम झाल्यामुळे स्किनला चिकटणारे कपडे इरिटेशन क्रिेएट करतात. ज्यामुळे रॅशेज होण्याचा धोका असतो.

कपडे आणि शूजमध्ये मेटल असू नये

कपड्यांमध्ये अनेकदा वेगळा पॅटर्न करण्यासाठी मेटल रिंग्सचा वापर करण्यात येतो. शूजलाही अनेकदा बक्कल इत्यादींपासून तयार करण्यात येतात. त्यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे,  उन्हामुळे हे गरम होतात आणि त्यामुळे त्वचेला नुकसान पोहोचतं. अशातच ते कपडे आणि शूज परिधान करा ज्यांमध्य मेटलचा वापर करण्यात आलेला नसेल.

Web Title: Useful tips for summer shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.