तुम्ही ट्रायल रूममध्ये 'या' चुका तर करत नाही ना? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 04:13 PM2019-07-23T16:13:29+5:302019-07-23T16:15:42+5:30

कपडे खरेदी करण्याआधी ते ट्राय करू आपल्याला फिट बसत आहेत का? किंवा ते आपल्याला छान दिसत आहेत ना? हे पाहणं अत्यंत आवश्यक असतं.

Trial or fitting room mistakes which one must not do | तुम्ही ट्रायल रूममध्ये 'या' चुका तर करत नाही ना? 

तुम्ही ट्रायल रूममध्ये 'या' चुका तर करत नाही ना? 

googlenewsNext

कपडे खरेदी करण्याआधी ते ट्राय करू आपल्याला फिट बसत आहेत का? किंवा ते आपल्याला छान दिसत आहेत ना? हे पाहणं अत्यंत आवश्यक असतं. अनेक छोट्या कपड्यांच्या दुकानांपासून मोठ्या मॉल्सपर्यंत सगळीकडे ट्रायल रूम्स असतात. या छोट्याशा खोलीमध्ये अनेक आरसे लावलेले असतात. परंतु अनेकदा असं दिसून येतं की, ट्रायल रूमबाबत लोकं अनेक चुका करतात. ज्यामुळे दुसऱ्या कस्टमर्ससोबतच तेथील स्टाफला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जाणून घेऊया ट्रायल रूम्सबाबत आपण कोणत्या चुका करतो? 

कपडे अस्थाव्यस्थ टाकणं 

तुम्हीही न आवडलेले किंवा फिट न बसलेले कपडे ट्रायल रूममध्ये तसेच ठेवून जातो? असं करत असाल तर असं करणं टाळा. कपडे तिथेच सोड्याऐवजी ते बाहेर घेऊन या आणि शॉपच्या स्टाफ मेंबरला द्या. यामुळे ते कपडे व्यवस्थित घडी करून पुन्हा शॉपमध्ये ठेवू शकतील. 

फोटो सेशन 

अनेकदा असं दिसून येतं की, अनेक मुली किंवा मुलं ड्रेस ट्राय केल्यानंतर फोटो अथवा सेल्फी काढतात. हे त्या आपल्या मित्र-मैत्रिणींना फॉरवर्ड करतात किंवा सोशल मीडियावर अपलोड करतात. पण असं करत असाल तर त्वरित थांबवा. कारण तुम्ही यासाठी फार वेळ खर्च करता आणि बाहेर वाट पाहत असलेल्या ग्राहकांना उगाच वाट पाहत बसावं लागतं. 

दुर्गंधी येणारे शूज 

जर तुम्हाला माहित असेल की, तुमच्या शूजमधून किंवा सॉक्समधून दुर्गंध येत असेल तर ट्रायल रूममध्ये अजिबात शूज काढू नका. ट्रायल रूम फार छोटी असून तिथे व्हेटिलेशनसाठी खास व्यवस्थाही नसते. त्यामुळे तो दुर्गंध तसाच रूममध्ये पसरतो. तुमच्या नंतर येणाऱ्या कस्टमर्सना फार समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

कपडे फाटणं किंवा खराब होणं

कपडे ट्राय करताना जर ड्रेस कुठे फाटला किंवा लिप्स्टिक किंवा इतर काहीही डाग लागला तर गपचूप दुसऱ्या कपड्यांसोबत ठेवून देऊ नका. तेथील स्टाफला सांगा, जर त्यामुळे तो ड्रेस खरेदी करावा लागेल असा त्यांनी आग्रह धरला तर भांडू नका. समजूतदारपणाने परिस्थिती हाताळा. कारण चूक तुमच्याकडून झाली आहे. 

बराचवेळ फोन कॉल 

कपडे ट्राय करताना फोनवर गप्पा मारणं तुमच्यासाठी कंफर्टेबल असेल पण हे तिथे असलेल्या इतर कस्टमर्ससाठी फायदेशीर ठरेल असं नाही. कारण इतर कस्टमर्स बाहेर वेट करत असतात. त्यामुळे ट्रायल रूममध्ये फोनवर जास्तवेळ बोलू नका. 

एकटेच जा

अनेकदा मुली ट्रायल रूममध्ये जाताना मैत्रिण किंवा आईला सोबत घेऊन जातात. अशावेळी कपडे ट्राय करायला प्रचंड वेळ लागतो. बाहेर उभ्या राहणाऱ्या कस्टमर्सना वाट पाहावी लागते.
 
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. 

Web Title: Trial or fitting room mistakes which one must not do

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fashionफॅशन