बॉलिवूडचीफॅशनिस्तासोनम कपूर अनेकदा आपल्या हटके आउटफिट्समध्ये दिसत असते. सोनम एक अशी अभिनेत्री आहे जी सतत आपल्या लूक्समध्ये एक्सपरिमेंट करताना दिसते. पम एक्सपरिमेंट करूनही ती प्रत्येक लूकमध्ये फार सुंदर दिसून येते. अनेक तरूणी स्टाइल आणि फॅशनबाबत सोनमला फॉलो करताना दिसतात. 

सोनम कपूर कोणत्याही ड्रेसमध्ये फार सुंदर दिसून येते. तिची फॅशन स्टाइल, तिचा लूक चाहत्यांना नेहमीच भूरळ घालत असतो. याचाच पुरावा आहे सोनमचं लेटेस्ट फोटोशूट... 

सोनम कपूरने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. सोनमचा हा लूक फेस्टिव्ह सीझनसाठी अत्यंत क्सासी ठरेल. सोनमही या लूकमध्ये फार सुंदर दिसत आहे. 

सोनम कपूरच्या लूकबाबात बोलायचे झाले तर तिने फॅशन डिझायनर अनामिका खन्नाच्या कलेक्शनमधील व्हाइट साडी परिधान केली होती. ज्या साडीची बॉर्डर सर्वांचं लक्षं वेधून घेत होती. सोनचा हा लूक फेस्टिव्ह सीझनसाठी तुम्हीही कॅरी करू शकता. 

सोनमने या लूकसोबत धाग्यांनी नक्षीकाम कलेलं ओवर कोट मॅच केला होता. जो साडीसोबत परफेक्ट मॅच होता. 

सोनमच्या या ड्रेसव्यतिरिक्त तिने लाइट मेकअप, डार्क लिपस्टिकसोबत स्मोकी आय लूक कॅरी केला होता. हेअरस्टाइलबाबत बोलायचं झालं तर, केसांमध्ये भांग पाडून वेणी बांधली होती. 

याबरोबर सोनमने एंटिक चोकरसोबत हेव्ही ईअरिंग्स कॅरी केले होते. हातामध्ये सोनमने डिझायनर बांगड्या घातल्या होत्या. पूर्ण लूकमध्ये सोनम कपूर फार सुंदर दिसत होती. 

Web Title: Sonam kapoor fashion beauty tips for upcoming festival sonam kapoor traditional saree look style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.