बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंह आणि एनर्जी हे समीकरणचं झालं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपण जे करण्याचा विचारही करू शकत नाही ते रणवीर अगदी सहज करून मोकळा होतो. मग त्याचा लूक असो किंवा स्टाइल. एखादा डान्स असो किंवा डायलॉग. यासोबतच त्याच्या अभिनयाची शैलीही वेगळीच. आपल्या याच हटके आणि भन्नाट स्टाइलने लाखो तरूणींच्या गळ्यातील ताईत असणासोबतच रणवीर अनेक तरूणांचाही स्टाइल आयकॉन बनला आहे. रणवीरच्या फॅशन स्टाइलबाबत बोलायचे झाले तर तो नेहमी वेगवेगळ्या एक्सपरिमेंट्स करताना दिसतो. अनेकदा चाहते त्याच्या या एक्सपरिमेंट्सवर खूश होताना दिसतात. पण कधी कधी रणवीर त्याच्या भन्नाट आउटफिट्समुळे डोकं धरण्यासही भाग पाडतो. यावेळीही असचं काहीशी हटके स्टाइल रणवीरने ट्राय केल्यामुळे त्याचे चाहते विचारात पडले आहेत...

रणवीर सध्या आगामी चित्रपट 'गली ब्वॉय'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून त्याच्या या आउटफिटवरही 'गली ब्वॉय' असं लिहिलेलं आहे. पाहून तुम्हालाही काही विचित्र वाटलं? की सवय झाली आहे?

सोशल मीडियावरही चाहत्यांना रणवीरचा हा लूक फारसा आवडलेला दिसत नाही. त्याचा हा लूक पाहून चाहतेही विचारात पडले आहेत. पाहूयात रणवीरच्या या लूकवर चाहत्यांनी दिलेल्या कमेंट्स...

ये भाई क्या पहनता है?


मम्मीने आणलेलं स्वेटर पण घालायचंय आणि कूलसुद्धा दिसायचयं.


नाईट ड्रेस आणि रणवीर सिंह..... हे भलतचं काहीतरी...

रणवीर चा बिबट्या लूक...

हटके पण क्लासी शर्ट

काही तोडचं नाही...

तसं पाहायला गेलं तर आपण काय करावं किंवा काय परिधान करावं? हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. सध्याच्या तरूणाईलाही प्रत्येकबाबतीत स्वातंत्र्य हवं असतं. त्यामुळेच फक्त विचारांनीच नाही तर आपल्या स्टाइलबाबतही स्वतंत्रपणे विचार करणारा रणवीर तरूणींसोबतच तरूणांच्याही गळ्यातील ताईत आहे. एवढचं नाही तर, रणवीरची स्टाइल थोडी विचित्र असूनही अनेक लोकांचा तो स्टाइल आयकॉनही आहे. 

सध्या रणवीर त्याचा आगामी चित्रपट 'गली ब्वॉय'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात रणवीरसोबत अलिया भट्ट स्क्रिन शेअर करणार आहे. 

पाहा रणवीरचे आणखी फोटो :

Web Title: Ranveer singh get trolled for his new dress see twitter reactions and photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.