Nicholas Cage Dinosaur Skull Layer | निकोलस केज करणार डायनासोरची खोपडी परत
निकोलस केज करणार डायनासोरची खोपडी परत
हॉलिवूड स्टार निकोलस केज याने त्याच्याकडे असलेली डायनासोरची खोपडी परत करण्यास होकार दिला आहे. मंगोलियातून चोरीस गेलेली ही दुर्मिळ वस्तू त्याने २.७६ लाख अमेरिकन डॉलर्स मोजून खरेदी केली होती.

यासंदर्भात सरकारी पातळीवर अनेक घडामोडी घडल्यानंतर अखेर निकोलसने ही वस्तू मंगोलियन सरकारकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. मॅनहटनमधील यूएस अटर्नी प्रीत भरारा यांनी ही वस्तू सरकारच्या ताब्यात घेण्यासाठी नागरी जप्तीची तक्रार दाखल केली होती.

यासंदर्भातील कायदेशीर कागदपत्रांमध्ये निकोलसच्या नावाच्या उल्लेख टाळण्यात आला आहे. निकोलसच्या प्रसिद्धी विभागाने मात्र ही बाब मान्य करीत ही खोपडी २00७ मध्ये विकत घेतल्याची कबुली दिली आहे.

dinosaur
Web Title: Nicholas Cage Dinosaur Skull Layer
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.