न्यूयॉर्कमध्ये आयोजित मेट गाला 2019 मधील आपल्या लूकमुळे चर्चेत आलेल्या प्रियंका चोपडा, दीपिका पादुकोनच्या लूकच्या चर्चा सगळीकडे होताना दिसत आहेत. पण या फॅशन इव्हेंटमध्ये बिजनेसमन मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानीचा लूकही विशेष गाजला. ईशा आपल्या लग्नानंतर पहिल्यांदाच एका फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. 

बॉलिवूडचे सेलिब्रिटी आता हॉलिवूडच्या इव्हेंटमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. अशातच इंडियाचे टॉप मोस्ट बिजनेसमॅन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) ची मुलगी ईशा अंबानीच्याही अदा पाहायला मिळाल्या. ईशा न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेटा गाला 2019 या फॅशन इव्हेंटमध्ये लाइट पिंक कलरच्या गाउनमध्ये दिसून आली. ईशा अंबानीचे या शोमधील फोटो प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रबल गुरुंग यांनी पोस्ट केले होते. ईशाचे हे फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत. या लूकमध्ये ईशा एखाद्या प्रिंसेसप्रमाणे दिसत आहे. 

ईशाने अत्यंत सुंदर लाइट पिंक कलरच्या वी नेक बाल गाउनमध्ये एन्ट्री केली. 

डिझायनर प्रबर गुरांगने ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाउंटवर ड्रेसचे सर्व डिटेल्स शेअर केले होते. त्यामध्ये त्याने लिहिलं आहे की, 350 तासांमध्ये ईशाचा हा ड्रेस तयार करण्यात आला. 

गाउनवर क्रिस्टल हॅन्ड अम्ब्रॉयडरी आणि ऑस्ट्रिच फेदर यूज करण्यात आलं आहे. 

ईशाचा हा लूक कंप्लीट करण्यासाठी डायमंड ज्वेलरी आणि लाइट मेकअप करण्यात आला होता. ईशाचा स्मोकी आय मेकअप पूर्ण गेटअप परफेक्ट करण्यासाठी मदत करत होता. 
मेट गाला 2019 मध्ये यावेळी Camps: Notes on fashion ही थीम ठेवण्यात आली होती. सर्व सेलिब्रिटी ही थीम फॉलो करताना दिसून आले. 

मुकेश अंबानी आणि नीता अंबानीची मुलगी ईशा अंबानीने आपली लगीनगाठ मागील वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये आनंद पिरामल यांच्याशी बांधली आहे. याआधीही ईशा अनेक मोठ्या इव्हेंट्समध्ये अनेक क्लासी आणि डिफ्रंट आउटफिट्समध्ये दिसून आली. तिचा लूक आणि स्टायलिश अंदाजामुळे ती अनेक लोकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.


 
दरम्यान, य इव्हेंटमध्ये प्रियंकाचं अद्भूत रूप पाहायला मिळालं. येथे प्रियंका चोप्रा व्यतिरिक्त बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादूकोनही पोहोचली होती. दोघींचाही लूक फार वेगळा होता.

प्रियंका चोप्राने तिसऱ्यांदा मेट गाला अटेंड केला आहे. तर लग्नानंतर पहिल्यांदा पती निक जोनाससोबत ती या इव्हेंटमध्ये उपस्थित राहिली. दोघांनीही लग्जरी ब्रँड डियोर (Dior) चे ड्रेस वेअर केले होते. 


Web Title: Met gala 2019 isha ambani violet gown at the pink carpet after marriage
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.